ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जवळ्यात साठे जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा उपक्रम

August 4, 202112:53 PM 62 0 0

नांदेड – शोषित, दलित, पीडित वर्गाच्या वेदना शब्दबद्ध करणारे; बहुजनांचे प्रबोधन करुन त्यांना सामाजिक विषमता आणि भांडवलशाही विरुद्ध लढण्यास समतेचा मार्ग दाखविणारे क्रांतिकारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील कोहिनुर हिरा होते असे प्रतिपादन येथील आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले यांनी जवळा येथे केले. ते लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संभाजी गवारे, नामदेव शिखरे, मारोती चक्रधर, रत्नदीप गच्चे, चांदू गोडबोले, आनंद गोडबोले आदींची उपस्थिती होती.

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथे कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच इतर मान्यवरांनी पुष्पवंदन केले. यावेळी बोलतांना ढवळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात उपेक्षितांच्या वेदनेचे प्रतिबिंब आहे. त्यांनी इथल्या न्यायवंचितांचा आणि हक्कवंचितांचा लढा चालविला. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य चळवळीतील ज्वलज्जहाल नेते होते. त्यांचे शिस्त, तत्वनिष्ठपणा, बाणेदारपणा आणि कुशाग्र बुद्धीमत्ता हे गुण घेण्यासारखे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंदच आहेत. तरीसुद्धा शिक्षण बंद पडलेले नाही. गृहभेटीच्या माध्यमातून शिक्षक संपर्कात आहेत. कार्यानुभव, शारीरिक शिक्षण आदी विषय कोरोनाचे नियम पाळून कमी कालावधीसाठी शिकवण्यात येतात. टिळक पुण्यतिथी व साठे जयंतीनिमित्त स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक ढवळे, शापोआ मदतनीस हैदर शेख यांच्यासह कृष्णा शिखरे, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, गितांजली गोडबोले, कावेरी गच्चे, अक्षरा शिंदे, रितेश गवारे, दिपक शिखरे, शादुल शेख, श्रुती मठपती, अक्षरा शिखरे, विश्वदिप झिंझाडे, योगेश मठपती, तेजल शिखरे, शाहेद शेख, पंचशील गच्चे, पीरखाँ पठाण आदींनी सहभाग घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *