ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण मधील संजय होळकर व विद्या़धर पाटील हे दोन शिक्षक राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित .

September 23, 202113:32 PM 12 0 0

तृप्ती भोईर

उरण तालुक्यातील मोठीजुई येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय होळकर व सारडे येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल उलवे या शाळेचे शिक्षक विद्याधर पाटील यांना यावर्षीचा राज्यस्तरीय जीवनदिप शिक्षकरत्न पुरस्काराने देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकुण ३५ शिक्षक बंधु – भगिनी, तर ५ शैक्षणिक संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणाचा सोहळा जीवनदीप महाविद्यालय गोविळे – टिटवाळा ठाणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

शाल ,श्रीफळ, सन्मान चिन्ह , सन्मान पत्र व वंदनीय आणि पुजनीय तुळशी चे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात गणेश पुजन व दिपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर कलर मराठी वाहिनीवरील नवोदित गायींकानी “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” या अभंवाणीतील भक्तीरसाने मंत्रमुग्ध केले.   पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे म्हणून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे हे होते. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रविंद्रजी घोडविंदे, विजय यादव, विरेंद्र ठाकुर असे विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *