जालना ( प्रतिनिधी) : मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ( ता. १३) जालना नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता विभागातील महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत परिसरात सकाळी ११.०० वा. आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्षा श्रीमती फरहाना सय्यद रहीम, स्वच्छता सभापती हरेश देवावले , मुख्याधिकारी श्री नितीन नार्वेकर, यांच्या हस्ते शहर स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वच्छता विभाग प्रमुख राहुल मापारी, शहर पर्यवेक्षक राजू मोरे, स्वच्छता निरीक्षक पंडित पवार, सॅमसन कसबे, अशोक लोंढे, संजय खांडेकर, विलास गावंडे, सतीश पाजगे, अरुण वानखेडे, राधेश्याम लोखंडे , लिपिक निलेश शंकरपेल्ली, कांचन वरवटकर, शहर समन्वयक सुजाता तुपे, हर्षा नारखेडे, ऋषिकेश शेडूते, पांडुरंग वाघमारे , महिला स्वच्छता कर्मचारी सुशीला मिसाळ,पार्वती गोफणे,जगधने,कपूर,घुले यांच्या सह महिला सफाई कामगारांची उपस्थिती होती.
Leave a Reply