ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संत रविदास महाराज व्याख्यानमाला तात्पुरती स्थगित

February 24, 202123:10 PM 47 0 0

जालना ( प्रतिनिधी) : कोवीड संसर्गाचा अचानक वाढता प्रादुर्भाव जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमां बाबत दिलेल्या सूचना लक्षात घेता जालना शहरात आज पासून आयोजित करण्यात आलेली संत गुरू रविदास महाराज व्याख्यानमाला तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती व्याख्यानमाला संयोजन समितीच्या अध्यक्षा नंदाताई पवार व सचिव विशाल साळवे यांनी दिली.

जालना शहरात मागील आठ वर्षांपासून संत गुरू रविदास महाराज व्याख्यानमाला घेण्यात येते. यंदाही जयंती निमित्त दि. २५ व २६ फेब्रुवारी दरम्यान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून सदर व्याख्यानमाला घेण्याची तयारी संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती. तथापि कोवीड महामारीचा फैलाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कालच सार्वजनिक कार्यक्रमां बाबत निर्बंध लादले. हे लक्षात घेऊन सदर व्याख्यानमाला तात्पुरती स्थगित करण्यात आली असून कोवीड संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊन परिस्थिती पुर्व पदावर येताच प्रशासनाच्या रितसर परवानगी ने स्थगित करण्यात आलेली व्याख्यानमाला पुन्हा घेण्यात येईल. असे अध्यक्षा नंदाताई पवार, सचिव विशाल साळवे व संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *