जालना/प्रतिनिधी जालना शहराजवळील मुक्तीधाम आश्रम सावरगांव येथे वारकरी संप्रदायाचे कलस्थान असणारे संत तुकाराम बीज साजरी करण्यात आली.
वारकरी संप्रदायत संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास अनन्य साधारण महत्व आहे.परंतु वाढत्या कोरोणा महामारीमुळे धार्मिक कार्यक्रमाला बंदी व मोजक्याच व्यक्तींना परवानगी असल्यामुळे संत तुकाराम बीज पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी गडाचे महंत अनिरूध्द महाराज क्षिरसागर यांचे किर्तन झाले. त्यानंतर ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे जगत्गुरू तुकाराम महाराज यांच्या चरित्र्यावर प्रवचन झाले. त्यावेळी त्यांचा सत्कार गडाचे महंत अनिरूध्द महाराज यांनी ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे यांचा सत्कार केला. ज्ञानदेव रचीला पाया, तुका झालेसे कळस. भजन करा सावकाश, असे संताचे मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र भक्कड, विठ्ठल काळे, बबन गोडबोले, कैलास बियाणी, संजय राठी, रामराव काळे, बजरंग भक्कड, विठोबा लोखंडे, डॉ. सुमीत कल्याणीकर, हरिओम लोखंडे, विजय मिसाळ आदिंची उपस्थिती होती.
Leave a Reply