ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण नगरपरिषद वतीने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान पंचवीस हजार

November 1, 202112:40 PM 48 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण नगर परिषद कर्मचार्यांना भरीव असे सानुग्रह अनुदान रक्कम रू. २५००० मंजूर केल्याबद्दल उरण नगरपरिषद . नगराध्यक्ष सायली म्हात्रे ,, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी मुख्याधिकारी संतोष माळी ,सर्व गटनेते आणि नगरसेवक, नगरसेविका यांचे म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड . सुरेश ठाकूर आणि सरचिटणिस अनिल जाधव , यांच्या मार्गदर्शनाखाली रक्कम रू. २५००० ( पंचवीस हजार ) ची मगणी के‌ली होती.

कोवीड कालावधीत उरण नगरपरिषदेच्या कामगार कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले त्या कार्याला विचारात घेऊन सहानुभूतीपूर्वक म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या सालाबादप्रमाणे दिवाळी सणानिमित्त केलेल्या सानुग्रह अनुदानाच्या मागणीला १००% प्रतीसाद दिल्याबद्दल संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर भोईर . सचिव नरेंद्र उभारे आणि कामगार कर्मचारी यांनी जाहीर आभार मानले!

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *