ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

October 28, 202113:47 PM 50 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मृत कोरोना रुग्णांच्या वारसांना मिळणार लाभ. अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच होणार जाहीर मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 30 जून, 2021 रोजीच्या आदेशानुसार व त्यानुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु.50,000/- (अक्षरी रु. पन्नास हजार मात्र) एवढे अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे.त्यानुसार याचा लाभ रायगड जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 4385 एवढी आहे तर एकट्या उरण तालुक्यात कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 317 एवढी आहे. त्यामुळे थोडेफार का होईना शासनातर्फे या मयत कुटुंबाना आधार मिळणार आहे.


प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दि. 12 आक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केल्यानुसार पुढीलप्रमाणे उक्त सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग जि. रायगड पिन-402201, संपर्क क्रमांक 02141-222097 टोल फ्री नंबर 1077, ईमेल आयडी [email protected]
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हाधिकारी, रायगड हे अध्यक्ष आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल, त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग अंतर्गत असलेल्या रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत दि 26/10/2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार /प्रसिद्धी पत्रकानुसार आजपर्यंत रायगड जिल्ह्यात कोरोना होऊन मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 4385 एवढी आहे. रायगड जिल्ह्यात 15 तालुके असून यापैकी एकट्या उरण तालुक्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या मयत रुग्णांची संख्या 317 एवढी आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील 317 मयत व्यक्तींच्या वारसांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत शासनातर्फे मिळणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *