ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनाविरोधात सप्तरंगी साहित्य मंडळाचा ‘एसिपी’ उपक्रम

March 20, 202115:13 PM 125 0 0

नांदेड – शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नागरिकच आता संपूर्ण टाळेबंदीची मागणी करीत आहेत. तर काही जण लाॅकडाऊन हा अंतिम पर्याय नसून आवश्यक त्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची निर्मिती करावी, ही अपेक्षा व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांचे नैतिक कर्तव्य म्हणून येथील सप्तरंगी साहित्य मंडळाकडून प्रत्येक घरांत एसिपी म्हणजे ‘अन्टी कोरोना पोलिस’ हा उपक्रम राबविण्यात यावा, याबाबत सर्व कवी, साहित्यिकांना आणि त्यांनी त्यांच्या संपर्कक्षेत्रातील इतरांना आवाहन करावे हा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम मसुदा मंडळाच्या समाज अभ्यास समितीने तयार केला असून तो कोरोनाचा कहर संपेपर्यंत दररोज प्रसारीत करण्यात येणार आहे, अशी माहिती अभ्यास समितीप्रमुख गंगाधर ढवळे यांनी दिली.

गतवर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यासाठी मंडळाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.‌ कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखून कोरोनावरील विजय मिळवण्यासाठी जनतेने दुसऱ्या लढाईसाठी सज्ज रहायला हवे. यासाठी साहित्य मंडळाने अधिकाधिक काळजी घेऊन ही शृंखला खंडीत करण्यासाठी एसिपी हा उपक्रम आणला आहे. या उपक्रमात प्रत्येक घरातच एका एसीपीची नियुक्ती करायची आहे. हे एसिपी बाहेर जाणे अत्यावश्यकच असल्यास मास्क किंवा रुमाल बांधणे बंधनकारक करतील. बाहेरून घरात येणाऱ्या लोकांना निर्जंतुकीकरण करण्यास सांगतील. हे एसिपी घरातील वयोवृद्ध तसेच आजारी व्यक्तीची काळजी घेतील. चुकीची माहिती, फोनद्वारे अफवा, अतिरंजित माहिती वा व्हिडिओ यांची खात्री करतील आणि वेळीच अशा प्रकरणांना थांबवतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यास प्रयत्नशील असतील. असा सोपा आणि सहज पद्धतीने राबविण्यात येऊ शकणारा आणि जागरुकता निर्माण करणारा असून कुटुंबप्रमुखांनी घरातील जाणत्या व्यक्तिची एसिपी म्हणून नियुक्ती करावी अशी विनंती मंडळाकडून तयार करण्यात आलेल्या मसुद्यात करण्यात आली आहे. सद्या दिवसभरात कडक लाॅकडाऊन नसले तरी बाहेर जाणार्‍या लोकांनी मास्क वापरण्याबरोबरच सॅनिटाईझर, फिजिकल डिस्टन्सचा वापर करणे अनिवार्य आहे असेही एसीपीने सुचवायचे आहे. ही सर्व माहिती एसीपी या उपक्रमांतर्गत हरेकांनी हरेकाच्या मोबाईलवर व्हाटसपद्वारे सतत पाठवायची आहे. तसेच त्या प्रत्येकांनी इतरांनाही पाठवावयाची आहे. यात ही जनजागृतीची शृंखला जबाबदारीने पुढे चालवायची आहे. याबाबत आपल्या संपर्कक्षेत्रातील सर्व साहित्यिक, कवी मित्रांना पुढाकार घेण्याचे आवाहन सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सचिव पांडुरंग कोकुलवार, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, कार्याध्यक्ष मारोती कदम, शंकर गच्चे, राज्य संघटक प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, गोविंद बामणे, लक्ष्मण लिंगापुरे, भीमराव ढगारे, रवी भद्रे, दिगांबर श्रीकंठे, सतिश शिंदे, छाया का़ंबळे, कपिल मुळे, भैय्यासाहेब गोडबोले, सुभाष लोखंडे, निवृत्ती लोणे, राजेश गायकवाड, शेख जाफरसाब, मिलिंद दरबारे, राहुल जोंधळे आदींनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *