ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या प्रज्ञांकुर या भीम जयंती विशेषांकाचे थाटात प्रकाशन

April 27, 202215:17 PM 27 0 0

नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ‘प्रज्ञांकुर’ या भीमजयंती विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जयदीप कवाडे, आमदार बालाजी कल्याणकर,मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, प्रवीण साले, रमेश सोनाळे, भदंत पंय्याबोधी, श्रीकांत गायकवाड, पंढरीनाथ बोकारे, भीम महोत्सवाचे संयोजक बापूराव गजभारे, मुख्य संपादक मारोती कदम, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर आदींची उपस्थिती होती.
डॉ. बी आर आंबेडकर फाउंडेशनच्या यांच्या वतीने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यावेळी समता गौरव पुरस्कार पत्रकार श्रीमंत माने, कृष्णाई जिल्हा पत्रकार पुरस्कार प्रल्हाद कांबळे, छायाचित्रकार पुरस्कार ज्ञानेश्वर सुनेगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान, सप्तरंगी साहित्य मंडळाच्या प्रज्ञांंकुर या भीमजयंती विशेषांकाचे मोठ्या थाटामाटात प्रकाशन संपन्न झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गायिका गिन्नी माही यांनी आपल्या संचासह बुद्ध भीम गितांचे सादरीकरण केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *