ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करकंब ला लसीकरण पुरवठा वाढविण्याची गरज  सरपंच तेजमाला पांढरे, (करकंब) यांची मागणी

August 29, 202115:11 PM 62 0 0

सोलापूर प्रतिनिधी ,मयूरी उबाळे करकंब हे पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव असून व्यापार, शेती, उद्योग, बांधकाम याबाबत अग्रगण्य असे गाव असून याठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. या करकंब गावाशी संलग्न 25 ते 30 गावातील लोकांचा उद्योग, व्यापार, शेती, दवाखाना या माध्यमातून सततचा संपर्क असतो. करकंब येथे उपजिल्हा रुग्णालय (ग्रामीण रुग्णालय), करकंब पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कृषि मंडलाधिकारी कार्यालय, भिमा पाटबंधारे उपविभाग कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामसेवक, मंडलाधिकारी त्यातच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, तीन महाविद्यालये, चार हायस्कूल, एक साखर कारखाना तसेच बेदाना प्रक्रिया उद्योग, दोन पेट्रोल पंप, दोन राष्ट्रियकृत बँका, तीन सहकारी बँका, एक मर्चंट व इतर 10 ते 15 पतसंस्था गावामध्ये आहेत. करकंबची लोकसंख्या पाहता 25 ते 30 हजाराच्या सुमारास असून या लोकसंख्येच्या प्रमाणे करकंब येथे लसीचा पुरवठा झाला नाही.


करकंबमध्ये 18 ते 45 वयोगटातील लसीकरण करण्यासाठी संख्या वाढती आहे. परंतु 45 ते 75 वयोगटातील व्यक्ति लसीकरण करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांनीही लसीकरणाला न घाबरता लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. पण अशातच करकंबसाठी कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होत असल्याने करकंबमध्ये व्यापारी, भाजीविक्रेते, शेती विषयक दुकाणे, बांधकाम मजूर, कामगार, शेतमजूर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक वर्ग व सर्व सामान्य नागरिक विशेषतः महिला वर्ग आजही लसीपासून वंचित आहेत. ऑनलाईन पध्दतीने लसीकरण असल्याने लसीकरणात गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीमुळे करकंब सोडून परगावच्या लोकांना याचा लाभ मिळतो. मात्र करकंबमधील 20 ते 25 हजार लोकसंख्या असलेले गाव या लसीपासून वंचित राहत आहे. करकंब ग्रामपंचायतने यापूर्वी बऱ्याचदा लसीकरण पुरवठा जास्तीत जास्त करण्याची मागणी केली आहे. पण संबंधितानी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
आपल गाव आपल कुटूंब सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे. या लसीकरणासाठी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. परंतु वाडीवस्तीवरी 45 ते 75 वयोगटातील नागरिकांनी तपासणी करुन लसीकरण करुन घ्यावे. व्यापारी, उद्योजक, शेती व्यवसाय नागरिकांनी लसीकरण करुन तपासून आपला व्यवसाय करावा. शासनाचे नियमांचे पालन करुन आपल कुटूंब, आपली जबाबदारी या व्यक्ती व शासनाच्या नियमावलीचे अवलंबून करुन घ्यावे व प्रत्येकांनी लसीकरणासाठी पुढाकर घेतला पाहिजे. विशेषतः रक्षाबंधन या दिवशी करकंब येथे एकाच दिवशी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार करकंब येथे 200 महिलांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी महिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असे असले तरी शासनाने करकंब साठी जास्तीत जास्त लोकसंख्येच्या प्रमाणे दोन टप्प्यात 10 हजार प्रमाणे लसीकरणचा पुरवठा करण्यात यावा. – तेजमाला शरदचंद्र पांढरे (सरपंच, करकंब ग्रामपंचायत)

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *