ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ससून रुग्णालयातून तीन महिन्याच्या बाळाला पळवले

September 11, 202113:40 PM 66 0 0

पुणे शहरात एका पाठोपाठ एक खळबळजनक घटना घडत असल्याने, शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांमधून प्रश्न निर्माण केले जात आहे. पुणे स्टेशन परिसरातून १४ वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्काराच्या घटनेला आठवडा होत नाही, तोच एका रिक्षाचालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराची केल्याची संतापजनक घटना घडली होती. या दोन्ही घटनांनी पुणे शहर हादरून गेले असताना. पुन्हा एक खळबळजनक घटना घडली आहे, एका नर्सच्या वेशेतील महिलेने तीन महिन्यांच्या चिमुकलीला ससून रूग्णलायतून पळवून नेले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आणि त्या चिमुकलीची त्या महिलेच्या तावडीतून सुटका करत, तिच्या आईकडे सोपवले.


तर, आरोपी महिला उच्चशिक्षित असून तिला अनेक वर्षापासून मूल होत नव्हते. यातून तिने मुलीला पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. वंदना जेठे (रा. खराडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात काल दुपारी कासेवाडी भागात राहणारी एक महिला तिच्या तीन महिन्याच्या मुलीसह एका मैत्रिणीसोबत आली होती. तेव्हा त्या महिलेसोबत असलेली मैत्रीण काही कामानिमित्त बाहेर गेली. त्यानंतर काही मिनिटांनी आरोपी वंदना ही नर्सच्या वेशात त्या महिलेकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला बाहेर त्यांनी बोलावले आहे, मी बाळाला सांभाळते. नर्स असल्याने त्या महिलेने विश्वासाने मुलीला आरोपी महिलेकडे दिले. काही मिनिटांनी त्या मुलीची आई ज्या महिलेकडे आपण मुलीला दिले. तिथे परत आली असता ती आरोपी महिला कुठेही दिसत नव्हती. यावतर तत्काळ तेथील सुरक्षारक्षक आणि पोलिसांना माहिती दिली गेली. त्यानंतर सीसीटीव्हीत तपासणी केली गेली. त्यामध्ये आरोपी महिला रुग्णालयाच्या बाहेरील एका रिक्षात मुलीला घेऊन बसताना दिसली.
त्यानंतर तेथील रिक्षावाल्यांना याबाबत विचारणा केल्यावर, ज्या रिक्षात आरोपी महिला गेली होती. तो रिक्षावाला एकाचा मित्र असल्याचे समजले. त्या मित्राने आरोपी महिला ज्या रिक्षात बसली होती. त्याला फोनवर घटनेबाबत थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर रिक्षाचालकाने आरोपी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि यानंतर आरोपी वंदना हिला चंदननगर येथून अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात आले.
तसेच, आरोपी महिला वंदना मल्हारी जेठे हिची अधिक चौकशी केली असता. ती खराडी भागात राहणारी असून ती उच्चशिक्षित आहे. तिला अनेक वर्षापासून मूल होत नव्हते. यातून तिने मुलीला पळवून नेल्याची कबुली दिल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *