ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा ९ % लाभांश जाहीर. चेअरमन राजेंद्र घोरपडे व व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे यांची माहिती

August 28, 202114:08 PM 10 0 0

सातारा ,ता 27(विद्या सुरजकुमार निकाळजे) : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने चेअरमन राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे, संचालक मोहनराव निकम, भगवान धायगुडे,राजकुमार जाधव ,बंडोबा शिंदे, अनिल शिंदे, गणेश तोडकर, दत्तात्रय कोरडे, वैशाली जगताप, तुकाराम कदम, ज्ञानेश्वर कांबळे, राजाराम खाडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परामणे आदीची यावेळी उपस्थिती होती.


चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या विविध सुविधांची माहिती दिली.यावेळी बोलताना घोरपडे म्हणाले,सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर संचालक मंडळाने कमी केले तरी यावर्षी ४ कोटी ६ लाख इतका नफा झाला आहे.त्यामुळे ९% लाभांश देण्याची शिफारस करत आहे. याआधी दिर्घ मुदत कर्जाचा व्याजदर १४% होता तो सध्या १२.२५ इतका आहे.तर कोरोना काळात दोन नवीन कर्ज प्रकार सुरू करून त्याचा व्याजदर अनुक्रमे ७.६ व ९ % इतका आहे.
यावेळी बोलताना व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे म्हणाले, यापूर्वी सभासदांना फक्त आजारपणाची मदत दिली जात असे,त्यात बदल करून सभासदांची पत्नी किंवा पतीचा समावेश केला आहे.कोराना काळातही बँकेने सभासदांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.यापुढे इंटरनेट बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
जवळपास ३ तास चाललेल्या या सभेत सभासदांच्या सर्व प्रश्नांना चेअरमन राजेंद्र घोरपडे व व्हा.महेंद्र अवघडे यांनी उत्तरे दिली.
या सभेत महेंद्र जानुगडे, मच्छिंद्र मुळीक,मिलन‌ मुळे, सुरेश गायकवाड, बजरंग वाघ, संदिप किर्वे ,मोहन जाधव, रामभाऊ खाडे, अंजली कट्टे,उषा जाधव, ज्ञानेश्वर धायगुडे, दादा थोरात आदींनी सहभाग घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *