ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घरोघरी शाळा उपक्रमाचे जनक संजय खरात यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

September 10, 202115:12 PM 56 0 0

सातारा,(विदया निकाळजे) पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 संजय खरात मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगांव यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 6 सप्टेंबर 2021 रोजी पार पडला.


संजय खरात सरांनी आजपर्यंत केलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम तसेच कोरोना काळात ‘घरोघरी शाळा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमद्वारे राज्यभर सुरु असलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खरात सरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील 100 हून अधिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरीच सुमारे 2000 हून अधिक शाळांची निर्मिती करून शिक्षणाची ज्ञानज्योत अखंडपणे ठेवत ठेवली आहे.
आदर्श शिक्षिक संजय खरात यांना सन्मानित करताना पालकमंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील, अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा उदय कबुले साहेब, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी , उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे , समाज कल्याण सभापती सौ कल्पना खाडे मॅडम, महिला व बाल कल्याण सभापती सौ.सोनलीताई पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव साहेब, लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. श्रीमती प्रभावती कोळेकर मॅडम,जिल्हा परिषद सदस्य अरूण गोरे उपस्थित होते.
यावेळी संजय खरात बोलताना म्हणाले की या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा , सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचाही मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांसाठी इथून पुढे असेच विविध उपक्रमशील उपक्रम राबवणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *