ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे भरपावसात जोरदार सत्याग्रह आंदोलन

July 27, 202212:11 PM 22 0 0

जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील भाजप मोदी सरकार (ईडी) करवी काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांना चौकशीच्या नावाखाली राजकीय सुडबूध्दीने छळ करीत आहे. या कृत्याचा मंगळवारी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जुना जालना गांधी चमन येथे भरपावसात निषेध व्यक्त करून जोरदार सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सत्याग्रह आंदोलनात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करून जोरदार विरोधी घोषणा देण्यात आल्या. सोनियाजी के सन्मान मे काँग्रेस मैदान मे. राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। सोनिया गांधी जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, भिमराव डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, विमलताई आगलावे, सुषमाताई पायगव्हाणे, बदर चाऊस, एकबाल कुरेशी, सावंतकुमार अक्षय आदींनी आपल्या भाषणातून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करीत केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून श्रीमती गांधी यांचा करीत असलेला छळ ताबडतोब थांबविण्यात यावा. नसता जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. केंद्रातील भाजपा सरकार विरोधी पक्षाला कमकुवत करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू, लोकशाहीच्या मार्गाने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरूध्द काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकारच्या या घाणेेरड्या राजकारणामुळे देशात आणि समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आंदोलनामध्ये ज्ञानेश्वर भांदरगे, वसंत जाधव, त्रिंबक पाबळे, बाबासाहेब गाढेकर, रामेश्वर खरात, किसनराव मोरे, जावेद शेख बागवान, नारायण वाढेकर, चंद्रकांत रत्नपारखे, शेख शमशूद्दीन, जावेद बेग, किशन जेठे, सुरेश गवळी, फकीरा वाघ, शितलताई तनपूरे, चंदाताई भांगडीया, नंदाताई पवार, मंगलताई खांडेभराड, मंदा पवार, मंजु यादव, सुभाष कोळकर, ज्ञानेश्वर कदम, धर्मा खिल्लारे, गणेश चांदोडे, वाजेद खान, रहिम तांबोळी, संजय भगत, शिवाजी वाघ, गजानन खरात, सय्यद करीम बिल्डर, कलिम खान, नदीम पहेलवान, राजेंद्र जैस्वाल, संतोष अन्नदाते, बाबासाहेब सोनुवने, मनोहर उघडे, सतिष वाहुळे, विष्णू भालेराव, मुजम्मिल कुरेशी, जावेद अली, सोपान सपकाळ, अनिल कांबळे, रमेश शिंदे, वल्लभ कुलकर्णी, शेख इब्राहिम, शेख अस्लम, संदीप वाघ, लक्ष्मण कोरडे, गणेश आढे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले तर शेवटी शहर उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *