जालना प्रतिनिधी (अनिता पवार) : सायकल चालवा.पर्यावरण वाचवा पर्यावरण संवर्धनसाठी सायकल यात्रा करणाऱ्या प्रणाली चिकटेचा जालन्यात स्वागत व सत्कार. शदा जलसाक्षरता विभाग वणी, जि.यवतमाळ अंतर्गत प्रशिक्षित 21 वर्षीय जलदूत कु. प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकट,पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ हिचे जालना शहरात आगमन झाले असता शितल ताई तनपुरे, सरलाताई व्यवहारे, श्रद्धा व्यवहारे यांनी तिचे दिपारती करून स्वागत केले. SRM college of social work Chandrapur येथून BSW in Counseling चा Diploma course (MGAHV central university Wardha ) पुर्ण करून पर्यावरण संवर्धन,जलसाक्षरता, महिला सशक्तीकरण जनजागृती आणि लोकल परिस्थितीचा अभ्यास करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ही सायकल यात्रा आरंभिली असल्याचे प्रणालीने सांगितले.
सभोवतालील, दिवसेंदिवस बदलती भोगवादी जीवनशैली, वाढते मानसिक प्रदूषण त्यातून निर्माण होणार वातावरणीय प्रदूषण, तापमानवाढ, वातावरणदल, ऋतुचक्रबदल या बदलाच्या परिणामातुन निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व कृषी पर्यटन आणि तळाळात काम करणारी व्यक्ती यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे इ. आहे. आणि हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे. असेही तिने सांगितले
मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असुन, प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून, सोबत, कोणाचीही प्रवासाला स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सहकार्य सुद्धा लोकच करतात. 20 ऑक्टोबर 2020 पासुन प्रवास करत आता 10 महिने जास्त झाले. 10,820 (हजार) कि. मी. पेक्षा जास्त चा प्रवास 25 जिल्यांचा झाला आहे. प्रवासात लोकांचा प्रतिसाद खुप चांगला मिळतोय. अशा कोविडच्या काळातसुद्धा सहकार्य मिळत आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य करीत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास चालू आहे. माझ्या या सायकल प्रवासात लोकांना सांगत असलेली मुख्य 5 संदेश -ज्याचा संकल्प मी स्वतः घेतला असून, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
1. आपल्या आरोग्यासाठी वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी, मोटारगाडीचा वापर टाळून, शक्य ती कामे सायकलने करू या.
2. प्लास्टिक आणि प्लास्टिक च्या बाटल्यांचा वापर टाळूया, सोबत कापडी पिशवी ठेऊया पाण्याकेली.निसर्गाला प्रदूषणा पासुन वाचवू 3) पाण्याचा ताळेबंद करूया जल व मृदसंधारणाची कामे करू या ,उपलब्ध पाण्यानुसार त्याचे नियोजन व वापर करू या.’पाणी बचत व पाणी जिरवा’ या कामात सहभाग घेऊ या.
४. परिसरात झाडे लावू या व जगवू या. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या.*
५. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू यात आणि आपले आरोग्य सुधारू या.
या सर्व प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करू या. अशी भावना तिने व्यक्त केली.
प्रणालीच्या विचारांचे, धाडसाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे असे शितलताई म्हणाल्या.
यावेळी शिवाजीराव तनपुरे, अरुणराव व्यवहारे, अमोल शिंगणे हेही उपस्थित होते.
Leave a Reply