नांदेड – मातोश्री प्रि प्रायमरी स्कुल स्वामीविवेकानंदनगर कॅनॉल रोड नांदेड येथील शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की,मातोश्री प्रि प्रायमरी स्कुल स्वामीविवेकानंदनगर कॅनॉल रोड येथिल शाळेमध्ये भारताच्या पहिल्या स्त्रीशीक्षिका,मुख्याध्यापिका, समस्त स्त्रियांना शिक्षणरूपी उजेडाचा रस्ता दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी शाळेचे संचालक मा.एकनाथ कार्लेकर, जि प सहशिक्षक मा सुधीर वाघमारे, प्रा.राजेश गोणारकर उपस्थित होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. परिसरातील काही विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी काही विध्याथ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये अमिता कार्लेकर, बंधन गोणारकर, प्रमिता, तन्वी व पूरब गोणारकर यांनी बोबड्या शब्दात प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे आयोजन व आभार शाळेच्या शिक्षिका सौ रंजना कार्लेकर मॅडम यांनी केले.
Leave a Reply