संघर्षाचे बीज रोऊनी
स्त्रीयांना दीले शिक्षण
जोती बनली जोतीबांची
सावित्री त्रिवार तुज वंदन
टाकून पाऊल पावलां वरती
घडवून आणली समाजक्रांती
जागृत करुनी स्त्री शिक्षण शक्ती
केले समाज मत परिवर्तन–
समाज क्रांतीची लावून वात
दत्तक घेऊन पुत्र अनाथ
दीन दुबळ्याना दीला हात
सेवा करता थकली कधीना
देह जीजउवुनी झाला जरी चंदन-
सावित्री त्रिवार तुज वंदन ……
🖋️कवियत्री-संघमित्रा सोरटे🖋️
माळशिरस जिल्हा सोलापूर
Leave a Reply