ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सायली नितीन देशपांडे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आयोजित राष्ट्रीय कार्य व साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

March 22, 202215:11 PM 55 0 1

फलटण ( शहर प्रतिनिधी -सई निंबाळकर) : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक आयोजित राष्ट्रीय कार्य व साहित्य गौरव पुरस्कार सोहळा कालिदास कलामंदिर, शालिमार नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडला आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकाचे महापौर सतीश नाना कुलकर्णी, लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी, महेंद्र देशपांडे, राष्ट्रीय अध्यक्ष दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, विनोद कुलकर्णी, सह संपादक दै. प्रताप दर्शन, श्रीमती मधूगंधा इंद्रजित, अभिनेत्री किरण राव, प्रा. राम कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय जादूगार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रभूतींचा सत्कार या प्रसंगी करण्यांत आला आहे.
श्रीकांत कवळे, नायब तहसीलदार यांनी, प्रशासनाचा कणा म्हणून समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात ३० वर्षांहून अधिक स्पृहणीय आणि निस्वार्थी सेवा बजावलेलीआहे. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय पांडुरंग कवळे व सत्यवती कवळे यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत कवळे यांनी, सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी अशी ओळख जनमानसात निर्माण केली आहे. जागतिक महामारी-कोविडच्या अतिशय खडतर कालावधीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड योध्दा म्हणून अविरत शासन सेवा त्यांनी बजावलेली आहे. ३० वर्षांच्या सेवा कालावधीत असंख्य लोकोपयोगी काम पार पडलेली आहेत. रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून प्रशासन आणि कर्मचारी यांच्यामधील दुवा होण्याचं महत्कार्य त्यांनी पार पाडलेले आहे.
शासन सेवा बजावत असतानाच, त्यांनी “अंतरंग मनाचे” या पहिल्याच पुस्तकाद्वारे साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकून अवघ्या साहित्य क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ८९ वे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या पुस्तकाची दखल घेऊन स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. सदर पुस्तकाला, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जगविख्यात नेत्रतज्ञ यांच्याहस्ते,वि. स. खांडेकर साहित्य पुरस्काराने यापूर्वीच गौरविण्यात आले आहे. अनेक दैनिक वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंक आणि समाज माध्यमाद्वारे आपल्या निखळ आणी सोप्या मराठी भाषेत ललितबंधाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य त्यांनी आरंभलेले आहे.
सदर कार्यक्रमात, श्रीकांत कवळे यांना, त्यांच्या राष्ट्र आणि समाज यांच्याप्रति समर्पित राहून निरपेक्षपणे केलेल्या उपरोक्त उल्लेखनीय कार्याची दखल घेवून “राष्ट्रीय महसूल वैभव पुरस्कार” असा अद्वितीय राष्ट्रीय कार्य व साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. समाजाच्या सर्व थरातून तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सायली नितिन देशपांडे या सुमारे गेल्या 15 वर्षापासुन ज्योतिष विषयक मार्गदर्शन करतात त्या उत्कृष्ट कवयिञी असून त्यांना या पूर्वी साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन !

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *