उरण (संगिता पवार ) ट्रक चालकाला कोप्रोली रस्त्यावर रात्रीच्या अंधारात भूरळ आली असता,या घटनेची माहिती कोप्रोली येथील अष्टविनायक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक मधिल चालकांवर तात्काळ उपचार केले. अष्टविनायक रुग्णालयाच्या या सेवेमुळे मी देव पाहिला नाही पण देवदूत म्हणून ओळखला जाणारा कोप्रोली येथील अष्टविनायक रुग्णालयाचे डॉ प्रकाश परांजपे यांच्या रुपाने देवमाणूस पाहिला अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी अष्टविनायक रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीका यांचे कौतुक करताना व्यक्त केली आहे.
कोप्रोली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले की सोमवारी ( दि३०) खोपटा पुल ते कोप्रोली या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या एका पर राज्यातील ट्रक चालकाला रात्रीच्या अंधारात भूरळ आली.या घटनेत ट्रक चालक दगावला अशी चर्चा इतर वाहन चालकांमध्ये वर्तविण्यात येत होती.त्याच दरम्यान सदर घटनेची माहिती कोप्रोली येथील अष्टविनायक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश परांजपे यांना मिळताच त्यांच्या आदेशानुसार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका यांनी सदर ट्रक मध्ये चढून चालकाच्या शरीराची कोरोनाच्या संकटात ही तपासणी केली.तसेच पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
एकंदरीत अष्टविनायक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश परांजपे यांच्या वैद्यकीय सेवेमुळेच आज ( आर जे ३२- जी सी ८५७७ या ) ट्रक चालकाच प्राण वाचले आहे.तरी वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या इतर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीका यांनी अष्टविनायक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश परांजपे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा माणून कोरोनाच्या संकटात रुग्णांची हेळसांड होणार नाही ना याची खबरदारी घेऊन रुग्णांना तातडीने सहकार्य करावे अशी मागणी निर्भय म्हात्रे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
Leave a Reply