ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अनुसूचित जातीच्या व्यक्तींना मिळणार पक्के छत्र सातारा जिल्ह्यातील 835 घरकुलांना मिळणार 10 कोटी 2 लाख रुपयांचा निधी

January 23, 202213:37 PM 55 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : रमाई घरकुल निर्माण जिल्हास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे आयोजित करण्यात आली होती.835 घरकुलांना हिरवा कंदील मिळाला असून सुमारे दहा कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

सदर बैठकीत फलटण चे आमदार दीपक चव्हाण ,जिल्हाधिकारी शेखर सिंह,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ विनय गौडा ,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई ,समाजकल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे आणि इतर सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदर योजनेचा आढावा घेतला आणि योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना केल्या. प्राप्त प्रस्तावांची पाहणी करून पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात आली.835 घरकुलांसाठी सुमारे 10 कोटी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना हक्काचे छत्र मिळावे यासाठी सदर योजनेअंतर्गत पक्क्या घरासाठी अनुदान दिले जाते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *