ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियानांतर्गत शाळा स्वच्छता कृती आराखडा दोन दिवशीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

August 29, 202115:02 PM 103 0 -1

सातारा ,(विदया निकाळजे) दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, युनिसेफ व CYDA पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) फलटण, जिल्हा परिषद, सातारा शिक्षण विभाग, प्राथमिक- माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियानांतर्गत शाळा स्वच्छता कृती आराखडा जिल्हास्तरीय प्रशिक्षण ऑनलाइन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.


स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत मुलांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय, साबण व पाण्याने हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. या उपलब्ध सुविधांबाबत जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती जाणून घेणे तसेच शाळेमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्य विषयीचे बेंचमार्किंग निश्चित करण्यात येणार आहे. हे बेंचमार्किंग करण्यासाठी युनिसेफ व CYDA पुणे यांनी KOBO अप्लीकेशन तयार केलेले आहे. हे अप्लीकेशन अँड्रॉइड मोबाईल वर प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे .या अप्लिकेशनमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्य विषयीच्या प्रश्नांची माहिती भरल्यानंतर शाळेचे बेंचमार्किंग निश्चित होईल. या बेंचमार्किंग मध्ये प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे शाळांत कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे विचारात घेऊन शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करता येईल. अशा पद्धतीने प्रत्येक शाळेचा शाळा स्वच्छता आराखडा तयार झाल्यास स्थानिक पातळीवरील अशासकीय संस्था व सीएसआरच्या माध्यमातून शाळेमध्ये आवश्यक बदल व सुविधा प्राप्त करून घेण्यास मदत होईल.
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय उपक्रम व शालेय स्वच्छता, स्वच्छ विद्यालय पुरस्कार, शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयावर महेंद्र पवार सर व सुवर्णा साळवी, धनंजय कुलकर्णी हात धुण्याच्या सुविधांचे तंत्र विकसित करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी या विषयावर सविता बारंगळे व ज्योती कदम, कोबो अप्लीकेशन माहिती, कोरोना आणि शाळा या विषयावर माधुरी सोनवलकर व रामभाऊ खाडे, शालेय पाणी स्वच्छता व आरोग्य यांचे मुख्य भागीदार व त्यांची भूमिका या विषयावर अश्विनी नागे व प्रवीण गायकवाड, टाळेबंदीच्या काळात मुलांच्या मानसिकतेवर झालेले परिणाम व कोविड बद्दल समज-गैरसमज या विषयाचे दत्तात्रय नाळे व स्मिता जाधव या मास्टर ट्रेनर्स यांनी सखोल असे सातारा जिल्ह्यातील १३०० सुलभकांना प्रशिक्षिण दिले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील सहा शिक्षक सुलभक म्हणून सहभागी होते. केंद्र स्तरावरील हे सुलभक केंद्रातील प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण देणार आहेत.
या कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या ज्योती मेटे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, अधिव्याख्याता सुभाष बुवा, सी.वाय.डी. ए. चे प्रवीणसाहेब व आप्पासाहेब ढाणके , सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सुनील नागे, किरण शिंदे व तुकाराम लाळगे सर हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी तांत्रिक नियोजन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *