ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विज्ञान तुमच्या पाठीशी आहे

September 16, 202113:41 PM 54 0 0

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होऊन सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्या समाजातील महिला या अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडलेल्या नाहीत.त्या महिलेच्या घरातील पुरुष कुटुंबकर्ता असला तरी आपल्या घरातील महिलेच्या सांगण्या प्रमाणेच वागत असतो.त्यामुळे अंधश्रद्धा पसरत चालली आहे.ती रोखायचे असेल तर महिलांचे प्रबोधन किंवा समुपदेशन करणेची गरज निर्माण झालेली आहे. आता सध्या तुरुंगात सडत असलेल्या बाबांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या शिष्याच्या संख्या विचारात घेतल्या तर महिलांचीच संख्या जास्त दिसून आलेली आहे.अशी बुवाबाजी करणारे सर्वच तुरूंगात नाहीत बरेचसे बाहेरच त्यांचा गोरस धंदा आजही महिलांच्या आश्रयाने राजरोस चालूच आहे.आजही आपण जागोजागी घडलेल्या बातम्या वर्तमान पत्रातून वाचत असतो टीव्ही वर पहात असतो पण महिलांच्या मनोवृत्ती मध्ये बदल झालेला नाही. सावित्रीबाईंनी सन १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांना शिक्षण दिले पण त्या शिक्षणाचा महिला उपयोग काही करीत नाहीत.हाताचे बोटावर मोजता येतील एवढ्याच महिला अशा अंधश्रद्धे पासून दूर आहेत.


अशा अंधश्रद्धेमुळे आपल्या कुटुंबाचे किती नुकसान होत आहे आपण कर्जबाजारी होत आहे.याचा त्या विचार करीत नाहीत.पण अमुक अमुक बाबाने किंवा एखाध्या माताने सांगितलेले कितीही खर्च आला तरी त्याप्रमाणे करतात.पण यामुळे फायदा त्या बाबा किंवा मातेचाच होत असतो.हे आपल्या लक्षात येते नाही. आपल्या पदरात पडेल किंवा आपला फायदा काही दिवसात होईल पण दिवसा मागून दिवस,महिने,वर्षे संपून गेली तरी त्या बाबा अगर बुवाने सांगितले प्रमाणे होत नाही.आपण मात्र कर्ज बाजारी होतो.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
एक ठिकाणी म्हटलेले आहे” आपल्या हातावरील रेषा पाहून भविष्य घडत नसते तुमच्या हाताच्या मनगटातील ताकदीवर भविष्य घडत असते.” पण अलीकडे कष्ट न करता झटपट आपल्या घरात सुख शांती समाधान कसे मिळेल याचा शॉर्टकट मार्ग म्हणजे बुवा-बाबा-अम्मा यांच्याकडे जाणे.”कामा विना दाम” कधी कोणाला मिळते का ? हा साधा विचार विसरून जातात तीच माणसे अशा बुवांच्या मागे लागतात. यात चांगल्या सुशिक्षित महिलांचे आर्थिक आणि शारिरीक व मानसिक शोषण केलेली बातमी काही दिवसांपूर्वी तुम्ही आम्ही वाचलेली आहे.कोणी मांत्रिक तर अगदी प्रसिद्ध असणाऱ्या पुण्यातील दवाखान्यामध्ये त्याचा वापर केलेली बातमी आपण वाचली असेल.अशा पासून आपण बोध घेणेचा प्रयत्न केला पाहिजे.वर्तमान पत्रातील बातम्या वाचा ,दूरदर्शन वरील बातम्या पहा,आकाशवाणी वरील बातम्या ऐका यामधून आपल्या दैनंदिन जीवनात कसे बाबा बुवा फसवित आहेत यांच्या घडलेल्या घटनेतून आपण सावध होतो ” पुढच्यास ठेच मागचा शहाणा”या म्हणी प्रमाणे समाजात सुधारणा होऊ शकेल परंतु अलीकडच्या घराघरातून याला काही अपवाद असू शकेल पण महिला त्या वेगवेगळ्या मालिकांच्या मध्येच अडकलेल्या असतात.त्या वाचन किंवा बातम्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.म्हणजे खरे ज्ञान आपण ज्यामधून मिळते त्याकडे लक्ष देत नाहीत.याचा आपण घरातून विचार केला पाहिजे.कोणतेही काम मनापासून केले तर आपणास यश मिळत असते. किंवा पूर्वीची म्हण “प्रयत्न अंती परमेश्वर” पण अलीकडे प्रयत्नाचे अगोदरच अशा बुवा बाबाच्या माध्यमातून परमेश्वराकडे धाव घेतात मग ते सांगतात”अमुक अमुक उपवास करा,इतके आठवडे करा,मग अमुक अमुक पूजा अर्चा करा अमुक अमुक खर्च येईल.मग तुमच्या घरात सुख शांती समाधान किंवा तुमची इच्छा तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होईल.पण हे सर्व थोतांड आहे हे आपणास या अनुभव घेतल्या नंतर कळते.त्या अनुभवासाठी आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा भरपूर गेलेला असतो. आपण कर्जबाजारी झालेलो असतो. पुण्यातील एका महिलेने अशा मंत्रिकाच्या सांगण्या प्रमाणे उपाय केले पण त्याचे काय न होता तिच्याकडे असणारी रक्कम मात्र त्या भामट्याने लुटली आहे.आता त्या भामट्यावर पोलिसात केस दाखल झालेली बातमी वर्तमान पत्रात वाचली असेल.अगदी ताजी घटना बारामती पोलिसांनी कोण स्वतःला बाळु मामाचा अवतार समजत होता त्याला सातारा येथुन पकडून आणलेला आहे पैशाची लूट आणि महिला अत्याचाराचे आरोप आहेत.”दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये” हे उगीच आपण म्हणत नाही. आता तर काही दूरदर्शनच्या वाहिन्या वरून सुद्धा वेगवेगळ्या महाराज किंवा बाबा किवा अम्मा चे कार्यक्रम सुद्धा पाहवयास मिळतात.अशावर बंदी आणनेची गरज आहे.काम धंदा सोडून त्याप्रमाणे लोकांना अंधश्रद्धेकडे ओढत असतील त्यांचेवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.म्हणजे शासनच अशा महाराजांना राजरोस असा प्रसार करणेची परवानगीच दिलेली आहे काय ? समाजातील भोळी भाबडी नव्हे चांगली सुशिक्षित चांगली पदवीधर उच्च शिक्षित चांगले नोकरदार अशा बाबांच्या समोर बसलेले पाहुन त्याची कीव करावी वाटते.विज्ञान कोठे गेले आहे.एकाचे हृदय काढून दुसऱ्यास बसवले जाऊन तो माणूस जीवंत राहतो. हजारो किलो मीटरचे आपण दूरदर्शन वर पाहू शकतो.ही विज्ञानाची सफलता असेल तर तरी सुद्धा आपण अशा बुवांच्या किंवा बाबांच्या नादाला का लागत असतो. अभ्यास केला तर पास होता येते.प्रयत्न न करता मला पास करा,नोकरी मिळू दे अशी मागणी एखादा महाराज किंवा बुवाकडे करणे योग्य आहे का ? राज्य लोकसेवा आयोगाने ३६० जागा साठी परीक्षा घेतली त्यामध्ये ३लाख ६१ हजार विध्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले आहेत म्हणजे एक जागेसाठी १००० पेक्षा जास्त असतील जो गुणवत्ता प्राप्त असेल त्याचीच ३६० मध्ये निवड होत असेल ही काळ्या दगडावरची रेष असेल तरी सुद्धा काही महाभागांचा शोध घेतला तर त्यांच्या माता पिता कोणा भोंदू बाबा महाराज यांचेकडे प्रश्न विचारत असताना पाहिलेले आहेत.म्हणणे आपण किती अगतिक झालेलो आहोत.ह्याचा कोणी तरी विचार करणेची गरज आहे.,कठोर परिश्रमाला पर्याय नाही.या स्पर्धेच्या जगात आपणास जगायचे असेल तर अशा भोंदूबाबा बुवा यांच्यापासून लांब राहिले पाहिजे.तुरुंगात आहेत त्यांनी ज्यांना ज्यांना आशीर्वाद दिला ते आजही म्हणतात आपणास लुटून महाराजांनी किती संपत्ती लुटली आहे.जागा मठ ठिकठिकाणी बांधून श्रीमंत झालेले आहेत. याला श्रीमंत होण्यास समाजातील अंधश्रद्धाळू किंवा अडाणी जनता त्यामुळे कोणा म्हटलेले आहे “पंचांगा मागे लागतो अडाणी” हे काय?


प्रत्येक दिवस हा शुभ असतो अमावशा किंवा पौर्णिमा किंवा संक्रात, ग्रहण या दिवशी शुभ काम करीत नाहीत.पण छत्रपती शिवाजी राजांनी कधीही कोठे स्वारी करताना अमावशा, पौर्णिमा या अशुभ आहेत असे मानले नाही अमावशे दिवशीच बऱ्याच स्वाऱ्या करून जिंकलेल्या आहेत हा इतिहास आहे.राजांनी कधीही कर्मकांडे केलेली नाहीत अगर पूजा घातलेली नाही. कोणत्याही किल्ल्यास देवाचं अगर देवीचे नाव दिलेलं नाही.पण अलीकडे आपण कर्मकांड यात गुरफटत चाललो आहोत. तमुक देवाची कोंबड्याच्या जत्रा कोणी खाण्यासाठी सोबत जाणारे मात्र मृत्युमुखी पडलेली बातमी नगर जिल्ह्यातील वाचली होती आणि अलीकडे देवाला जाणाऱ्या वहानाचेच मध्येच भक्तांचेच अपघात होत असलेल्या घटना घडून बळी जात आहेत.देवाला गेले तर तो देव त्यांना वाचविन्यास येत नाही.एखादे बाळ वाचले तर ‘देव तरी त्याला कोण मारी”असें आपन पटकन म्हणतो.मग आपल्या देशातील देवळात एक आठ वर्षाच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार केला तर त्या देवळातील देवाने तिला वाचविले नाही त्यासाठी आपण देवांच्या वर किती विश्वास ठेवायचा ते आपन ठरविले पाहिजे.जे आपण कर्म करीत असतो तसे आपले चांगले वाईट होत असते.पुन्हा माणूस हताश होऊन म्हणत असतो माझे ते नशीबातच नव्हते.नशिबाला दोष देता काम नये.नशीब हे आपण घडवीत असतो.आपण नशीबा प्रमाणे घडते असे म्हणून एखाद्याने अभ्यासच करावयाचा नाही खाटेवर पडून राहिला तर माझ्या नशिबात असेल तर मी पास होईन किंवा नापास होईन तसे कधी होणार नाही. नशीब हा विचारच मनातून काढून टाकला पाहिजे.कोणताही दिवस वाईट नसतो.सर्व दिवस सारखे असतात.कोणता दिवस वाईट आहे हे तुम्ही आम्ही ठरविलेला असतो.गुरुवार दत्ताचा,शनिवार मारुतीचा,बुधवार विठ्ठलाचा,सोमवार शंकराचा असे तुम्ही आम्ही ठरविलेले आहेत.रविवार सुट्टीचा म्हणून त्या दिवशी शक्यतो मांसाहार करणारे “आज संडे खाऊ अंडे” असेही विनोदाने म्हणतात.हे सर्व आपल्या मानण्यावर आहे.या सर्व विवेचना मधून आपणा सर्वांना एकच सांगावयाचे आहे की आपण अंधश्रद्धे पासून लांब रहा आजही स्वतःच्या जवळच्या नातलगाच्या मुलांचे बळी दिलेल्या बातम्या वाचीत असतो.विज्ञानाची कास धरा”विज्ञान तुमच्या पाठीशी आहे” एवढेच सांगावेसे वाटते.
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील

भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा

मो.न.७५८८५६०७६१.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *