नागपूर येथील ‘सिव्हिल लाईन्स’ भागातील ‘वॉकर्स स्ट्रीट’वर ४ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत काही बुरखाधारी महिला येणार्या- जाणार्या हिंदु तरुणींना हेरून पत्रकांचे वितरण करत होत्या, तसेच त्यांना हिजाब घालण्यास सांगत होत्या, असा धक्कादायक प्रकार समोर आला.
तेव्हा धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्या काही जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याची माहिती विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन बुरखाधारी महिलांना जाब विचारल्यावर आपले बिंग फुटणार या धाकाने धर्मांध महिलांनी पळ काढला. सार्वजनिक ठिकाणी बळजोरीने हिंदु तरुणींना हिजाब घालायला लावणे, हा एकप्रकारे धर्मांतराच्या षड्यंत्राचाच प्रकार असून हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून दोषी व्यक्ती आणि त्यांचे सूत्रधार यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि धर्मजागरण मंच या संघटनांसह काही नागरिकांनी केली आहे. तसेच हिंदू मुलींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक असल्याचे येथे नमूद करावेसे वाटते जेणेकरून अश्या प्रकाराला त्या स्वतःच विरोध करू शकतील.
डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ
Leave a Reply