ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कुंबेफळ च्या सरपंच पदी सीमा गवारे तर उपसरपंच पदी दिनेश वाहुळ यांची बिनविरोध निवड

February 11, 202114:41 PM 41 0 0

जालना ( प्रतिनिधी) : तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सीमा राहुल गवारे यांची तर उपसरपंच पदी दिनेश बबनराव वाहुळ यांची बुधवारी ( ता. १०)बिनविरोध निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राहुल गवारे यांनी गावातील तरुण पिढीला संघटीत करत सर्व सात जागांवर एकतर्फी विजय संपादन केला. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आज विशेष सभा घेण्यात आली. यात सरपंच पदासाठी सौ. सीमा राहुल गवारे यांचा तर उपसरपंच पदासाठी दिनेश वाहुळ यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी दांडगे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य लता गवारे, सोनाबाई काटकर, राधा म्हस्के, गुलशन बेगम जहांगीर पठाण यांची उपस्थिती होती. पीठासीन अधिकारी म्हणून पी. एन. दांडगे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी दुर्गेश गिरी, ग्रामसेविका डोंगरे यांनी सहकार्य केले. सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बबन गवारे, सचिन क्षीरसागर, राहुल गवारे, विठ्ठल गवारे, रमेश वाहुळ, रमेश काटकर, मुकूंद सिरसाठ, इश्वर काटकर, महादु परळकर, वरून सिरसाठ, गणेश औरंगे, सुभान परळकर, शेषराव सिरसाठ, सारंगधर गवारे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *