ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भावना म्हात्रे यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य म्हणून निवड

March 29, 202213:17 PM 30 0 0

उरण दि 28(राघवी ममताबादे)  : रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे व रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या सदस्य पदी खोपटे गावातील रहिवाशी तथा महिला सामाजिक कार्यकर्त्या भावना कैलास म्हात्रे यांची महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

भावना कैलास म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक गोर गरिबांना मदत केली आहे. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. शिवाय त्यांना प्रशासकीय कामाचाही अनुभव आहे. जनसंपर्कही दांडगा आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनातर्फे त्यांची नियुक्ती सदस्य पदी करण्यात आली आहे.या समितीत निवड झालेल्या त्या एकमेव महिला आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *