ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विद्रोही पॅंथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

July 18, 202119:30 PM 10 0 0

लना ( प्रतिनिधी) : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील विद्रोही पॅंथर सामाजिक संघटनेत असंख्य तरुणांनी प्रवेश केला असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपील खरात व सचिव संदीप साबळे यांनी नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ( ता. १८) संघटनेची शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली.


संस्थापक अध्यक्ष कपिल खरात , सचिव संदीप साबळे,राहुल उघडे, विशाल तेझाड, माधव जाधव, रवि जाधव, किरण गंगातिवरे,योगेश पैठणे, ऋषिकेश मोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
संस्थापक अध्यक्ष कपिल खरात यांनी संघटनेची ध्येय, धोरणे, आणि वाटचाल या विषयी माहिती देऊन नव्याने आलेल्या तरुणांचा संघटनेत योग्य सन्मान केला जाईल असे सांगितले.
सचिव संदीप साबळे यांनी वंचित , उपेक्षित, अन्याय ग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटनेचे कार्य नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळा -गाळात पोहोचवावे असे आवाहन केले .
अध्यक्षीय समारोपात भास्कर बोर्डे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


राहुल उघडे यांची महाराष्ट्र प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असून त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. संघटनेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अरुण काळजे (जाफराबाद तालुकाध्यक्ष) ,मिलिंद खरात ( बदनापुर तालुकाध्यक्ष) ,विजय आढाव ( जिल्हा संपर्क प्रमुख ),दत्ता पवार ( जिल्हा संघटक), बाळकृष्ण सूर्य नारायण ( जिल्हा सचिव ) ,अजय सुतार ( शहर संघटक) ,जीवन दांडगे व लखन चित्तेकर ( प्रसिद्धीप्रमुख), आकाश लहाने व सागर गायकवाड (शहर प्रसिद्धीप्रमुख ), नंदू मिसाळ ( शहर सचिव),यांचा समावेश असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी समाधान दाभाडे, संदीप खरात, दीपक खिल्लारे, मिलिंद ढिलपे, विलास खरात ,प्रदीप खरात, किरण खरात ,शालीक खरात ,अशोक सोनवणे, चंदु गायकवाड ,गौतम तुपे, महेंद्र नवगिरे, विलास भालेराव, गजानन डोंगरे यांनी संघटनेत प्रवेश केला त्यांचे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात व सचिव संदीप साबळे यांनी स्वागत केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *