सातारा (सौ.विद्या निकाळजे) : सातारा जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक खटाव तालुक्यातील वडूज येथील यश उमेश यादव यांची एनडीए मध्ये निवड झाली आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण खटाव येथे इंग्रजी माध्यमातून झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले.
बारावीचे शिक्षण सुरू असतानाच तो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ची तयारी करत होता.बारावी नंतर पहिल्याच प्रयत्नात बंगळूर येथे झालेल्या एसएसबी( सेवा निवड समिती) परीक्षेमध्ये देशातील दहा हजार विद्यार्थ्यांमधून पहिल्या ४०० विद्यार्थ्यांमध्ये यशची निवड झाली. सातत्यपूर्ण प्रयत्न,अविरत कष्ट व आई -वडिलांचे खंबीर पाठबळ यामुळेच यशाला गवसणी घालू शकलो,असे प्रतिपादन यश याने केले.त्याच्या या निव डीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत आहे
Leave a Reply