ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सेवेकरी ..

July 20, 202112:21 PM 5 0 0

आहे साधा सेवेकरी
विठ्ठलाच्या मंदिरात
पडलेला असे तिथे
मुक्कामास दिनरात

झाडलोट लादी पुसे
स्वच्छता आवारात
हरि मुख दिसे मला
जात येत गाभा-यात

अभिषेक जल आणे
नदी स्नान घडे नीत
हार फुला लागे हात
आणेजेंव्हा पिशवीत

स्त्रोत्र मंत्र हरि पाठ
कानावरी राही येत
कळेना हे झाले कसे
न कळत मुखोद् गत

चालता महा आरती
राही नगारा वाजवत
प्रसादाच्या वाटपात
अमृताचे होती हात

चाले जशी शेजारती
उभा पंखा हलवत
निंद्रा लागे सहजचं
दिवा जाता मालवत

कृपा करी मज हरी
न जोडता कधी हात
जागा दिली मंदिरात
ठेवी सुखे आनंदात

– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *