ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शाहीरी परंपरा जपणारे शाहीर अप्पासाहेब उगले हे जालना जिल्ह्याचे वैभवच- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

August 24, 202118:17 PM 34 0 0

जालना, दि. २३(प्रतिनिधी)- मानवी जीवनातल्या व्यथा, भाव-भावना हे सर्व मांडण्याचे ताकद शाहीरीमध्ये असून गेल्या अनेक वर्षांपासून शाहीरी क्षेत्रात काम करणारे शाहीर अप्पासाहेब उगले हे जालना जिल्ह्याचे वैभवच असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केले. जालना येथे आयोजित राज्यस्तरीय शाहीरी कार्यशाळेत जिल्हाप्रमुख अंबेकर बोलत होते. यावेळी अ‍ॅड. सुनिल किनगावकर, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना अंबेकर म्हणाले की, शाहीरी ही अत्यंत जुनी लोककला असून या कलेच्या माध्यमातून आजही समाज जनजागृती केली जाते. ही कला वाढविण्यासाठी जिल्ह्यात शाहीर अप्पासाहेब उगले यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत केलेले कार्य अत्यंत वाखण्याजोगे आहे.

शाहीर उगले यांनी जिल्ह्यात अनेक युवकांना या कलेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. तसेच या युवकांनीही या कलेचे माध्यमातून जिल्ह्याचे नाव राज्य-देश पातळीवर नेण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य अत्यंत अभिमानास्पद आहे. शाहीर अप्पासाहेब उगले व शाहीर देवानंद माळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्य शाळेत राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून युवकांनी सहभागी होवून शाहीरीचे धडे गिरवले असल्याचे जिल्हाप्रमुख अंबेकरांनी सांगितले.
शाहीर अप्पासाहेब उगले यांच्या या कार्यशाळेस जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी भेट देवून सांगली, जळगाव, नाशिक, पुणे, लातुर, धाराशिव, बीड, मुंबई, संभाजीनगर आदी जिल्ह्यातून सहभागी झालेल्या युवकांचा यथोचित गौरव केला व प्रात्सोहन दिले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आपल्या लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्या वरुन शाहीरी या लोककलेच प्रचार व प्रसार करणारे शाहीर रामानंद उगले, शाहीर कल्याण उगले व त्यांच्या सहकाNयांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *