ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शाहीर गुलाबराव नळनिकर यांचा सत्कार

February 2, 202215:23 PM 44 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गांधी चमन जुना जालना येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या नंतर जालना जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जेष्ठ शाहीर गुलाबराव नळणीकर आणि त्यांच्या कलावंत सहकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीची भजने गाऊन कार्यकर्त्यांना मंत्रमुग्ध केले. याच कार्यक्रमात जेष्ठ लोककलावंत शाहीर गुलाबराव नळणीकर यांना मानाचा राज्यस्तरीय थोर कवी वामनदादा कर्डक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भारतीय कांग्रेस सरचिटणीस भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, कार्येध्यक्ष राजेंद्र राख, शहर अध्यक्ष शेख महेमुद, शहर उपाध्यक्ष फकिरा वाघ यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन सत्कार करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *