शाहू जयंती साजरी
यंदा घरातचं राहून
चित्र प्रेरणा दायक
चरित्रप्रभावी त्याहून
जाहीर उत्सव नाही
ढोल ताशा बडवून
उत्साह मात्र तसाचं
नियम सगळे पाळून
समग्र साहित्य त्यांचे
चला काढूया वाचून
चिंतन मनन करून
कर्म घेऊया समजून
उपकृत केले त्यांनी
आरक्षण मार्ग दावून
वंचित दीन मदतीला
सदैव जायचे धावून
शिक्षण सक्त न् मुफ्त
महत्व घ्यावे जाणून
जयंती योग्य साजरी
विचारआचराआणून
आता तरी भेदभावा
टाकायचे रे जाळून
गुन्हेगारांचे प्रबोधन
मुख्य प्रवाही आणून
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
Leave a Reply