ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शाहुराजे ..

June 26, 202112:51 PM 18 0 1

रयतेला प्रिय अति
अलौकिक शाहुराजे
शतक उलटले तरी
तव नाम डंका वाजे

बहुजन दीन दलीत
हृदयीप्रगल्भ विराजे
बळीराजा शिरावरचे
हलके केलेतं ओझे

सुधारता गुन्हेगारांना
गुन्हेगारी स्वता लाजे
तुमच्या संकल्पनेचा
तो नगारा सर्वत्र गाजे

अनिष्ट रुढी बंद होती
नव युग बिगुल गर्जे
विधवा पुनर्विवाहाने
सुखगुलाब फुले ताजे

रयतेवरती स्नेह किती
कुणी ना उपाशी निजे
लाडका सर्वांचा राजा
अक्षआठवणीत भिजे

– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
www.kavyakusum.com

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *