सातारा, (विदया निकाळजे) ‘शशिकांत शिंदे आणि प्रदीप विधाते ही जोडगोळी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झंझावात पुन्हा निर्माण करतील’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पक्षामध्ये कार्यकर्ते कसे असावेत याविषयी खुमासदार शैलीत श्री पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रगल्भ विचाराचा पक्ष आहे असेही सांगितले.
निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांचा झालेला निसटता पराभव याविषयी त्यांनी खेद व्यक्त केला आणि आगामी काळात श्री शशिकांत शिंदे यांना जनता पुन्हा निवडून देईल असा विश्वास व्यक्त केले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खादगुन येथे सव्वा तीन कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील बोलत होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे ,सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, युवा नेतृत्व सारंग पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस खटाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव ,जिल्हा नियोजन चे सदस्य सागर साळुंखे, बाळासाहेब इंगळे, माजी उपसभापती संतोष साळुंके ,आनंदराव भोंडवे ,दगडूदादा शिंदे, राजेंद्र कचरे ,जितेंद्र शिंदे ,सुरेश शेठ जाधव ,ज्ञानेश्वर जगताप ,उदय कदम रोहित लावंड सरपंच अमिना सय्यद वसंतराव जाधव गुरुजी उपसरपंच शिवाजी सावंत राम जाधव , खटाव तालुक्यातील पदाधिकारी राम रहीम संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply