उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील शहरात पी ओ बेकरी,कोट नाका येथे असलेले पोस्ट ऑफिस जेएनपीटी शॉपिंग सेंटर ,जेएनपीटी टाऊन शिप, येथे तातपुरत्या काळासाठी शिफ्ट करण्यात आले आहे . त्यामुळे उरण शहरातील नागरिकांना सह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना खूपच त्रास होत आहे . उरण शहरातील पी ओ बेकरी कोट नाका येथे असलेले पोस्ट ऑफिस असलेल्याइमारत फार वर्षा पूर्वीची असल्याने इंमारातीची दुरावस्ता झाल्याने तिचे बांधकाम करण्यासाठी व उरण नगरपरिषद ने सदर ची इमारत धोकेदायक जाहीर केल्याने कधीही जीवितहानी किंवा वित्त हानी होऊ शकेल या उद्देश्याने सिनिअर सुप्रीडेंट नवी मुंबई डिविजन ,पनवेल यांच्या आदेशाने पी ओ बेकरी उरण इमारती मधील पोस्ट ऑफिस सध्या तात्पुरत्या स्वरुपात जेएनपीटी टाऊन शिप येथे शिफ्ट करण्यात आले आहे .
पोस्ट ऑफिस जे एन पी टी येथे शिफ्ट केल्याने नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो .उरण येथील नागरिकांना पोस्ट ऑफिस जे एन पी टी जाण्यासाठी उरण ते जे एन पीटी येथे जाण्यासाठीरिक्षाला जायला ३० रुपये लागतात व यायला ३० रुपये लागतात . पैसा खर्च होतो त्याच प्रमाणे वेळेचा अपव्यय होतो
कोट नाका येथील पी ओ बेकरी ची इमारत मोडकळीस आल्याने उरण परिषद ने धोकेदायक इमारत जाहीर केल्याने तात्पुरत्या काळासाठी जेएनपीटी टाऊन येथे उरण चे पोस्ट ऑफिस शिफ्ट केले आहे .
किती दिवसा साठी केले आहे ते सांगू शकत नाही .अधिक माहिती साठी सिनिअर सुप्रीडेंट नवी मुंबई डिविजन पनवेल यांच्याशी संपर्क साधावा . ०२२-२७४६७९५९ ,२७४८३८८१ यांच्याशी संपर्क साधावा
रश्मी म्हात्रे ( SPM ) सब पोस्ट मास्तर उरण
जेष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिस मध्ये (MIS )मंथली इंटरेस्ट स्कीम ,SCSS,सिनिअर सिटीझन स्कीम ,सेविंग खाते अश्या अनेक् स्कीम साठी जावे लागते .उरण येथे पोस्ट ऑफिस असल्याने खर्च होत नव्हते आता जे एन पी टी टाऊन गेट पर्यंत रिक्शा ला एकेरी भाडे ३० रुपये मोजावे लागतात पुढे गेट ते पोस्ट ऑफिस चालत जावे लागते
जेष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे पोस्ट ऑफिस मध्ये नेट व लाईट नसेल तर दुसऱ्यांदा जावे लागते सर्वांचा विचार करता संबधित अधिकाऱ्यांनी उरण चे पोस्ट ऑफिस उरण शहरात ठेवण्याची लवकरात – लवकर व्यवस्था करावी अशी मागणी विमला तलाव मॉर्निंग कट्टा चे सर्व जेष्ठ नागरिकांनी केली आहे .
Leave a Reply