ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिखर शिंगणापूर – नातेपुते भवानी घाटातील भयानक अपघातात मायलेकांचा मृत्यू

December 17, 202112:47 PM 45 0 0

फलटणः( पूजा निकाळजे) : शिखर शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील माण तालुक्‍यातील भवानी घाटात पाचशे फुट खोल दरीत आज सकाळी साडेआठच्या दरम्यान कार कोसळली. शिखर शिंगणापूरहून नातेपुतेकडे जात असताना भवानी घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.या अपघातात गाडीतील माय-लेकराचा जागीच मृत्यू झाला.

गजानन सर्जेराव वावरे (वय 55) व त्यांच्या आई हिराबाई सर्जेराव वावरे (वय 85), अशी मृत्यू झालेल्या माय-लेकराची नावे आहेत. वावरे माय-लेक हे थदाळे (ता. माण) येथील रहिवाशी आहेत. सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी सोमवारी थदाळे या आपल्या मूळगावी आले होते.
आज सकाळी गजानन वावरे व त्यांची आई हे दोघेजण नाशिककडे जात होते. पण शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात पाचशे फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. गाडी दरीतल्या दोन टप्प्यांवर आदळल्यामुळे गाडीचा अक्षरशा चुराडा झाला आहे. शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. गाडीत दोघेच प्रवास करत होते. दोघांना उपचारासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नातेपुते पोलिस अधिक तपास करत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *