जालना ( प्रतिनिधी) : शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने ३९१ व्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समिती कार्यकारिणी गठित करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र राऊत यांची कार्याध्यक्षपदी सुभाष देवीदान तर सचिवपदी ॲड रवींद्र डुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
ज्येष्ठ समाजसेवक अंकुशराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समिती कार्यकारिणी निवडीसाठी गुरुवारी ( ता. ०४) “राजमाता गड” येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. तसेच विचारविनिमय करून कार्यकारिणी गठित करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जेष्ठ नेते विजयकुमार पंडित, गणेश सुपारकर,अशोक पांगारकर, जयंत भोसले,हरेश देवावाले,सुधाकर निकाळजे,तय्यब देशमुख, विमलताई आगलावे,संध्याताई देठे,विभावरी ताकट,रेणूका निक्कम, कार्यकारिणी सदस्य आर. आर. खडके,ज्ञानदेव पायगव्हाणे, कोषाध्यक्षपदी सतीश जाधव, प्रसिद्धीप्रमुख म्हणून आशीष रसाळ व जावेद तांबोळी यांची निवड करण्यात आली. यंदा उत्सव समितीतर्फे व्याख्यान ,पोवाडे असे प्रबोधनात्मक उपक्रम घेणार असल्याचा मनोदय उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र राऊत यांनी व्यक्त केला. तथापि जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक अशी उर्वरित कार्यकारिणी तसेच महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल. असे रवींद्र राऊत यांनी सांगितले .नूतन कार्यकारिणीचा यावेळी सत्कार करण्यात आला .बैठकीस विश्वासराव भवर, एकनाथराव गलधर, रामदास जाधव ,दिगंबर पेरे, सागर देवकर, अक्षय राऊत ,विलास तिकांडे, उमेश राऊत, अनिकेत मस्के, राहुल सुपारकर, विनोद पवार, विनोद कुमावत आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply