ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 202214:55 PM 38 0 0

जालना, दि. १९(प्रतिनिधी)- जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे व सर्व शिक्षक वृंद व वेशभूषेतील विद्याथ्र्यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहाराने पूजन केले. सर्व शिक्षक वृंद यांनी आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा जागर करतांनी इतिहासाला उजाळा देताना `शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते एक अपूर्व सोहळा शिवराज्यभिषेक’ या सर्व महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टी कथाकथन पद्धतीने विद्याथ्र्यांसमोर सादरीकरण केल्या. याप्रसंगी शाळेतील बहुसंख्य विद्याथ्र्यांनी शिवकालीन वेशभूषा करत छत्रपतींच्या इतिहासाला एक अनोखी झालर दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शुभांगी घाडगे व श्रद्धा कळमकर या विद्यार्थिनींनी केले. कथाकथनात शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र किर्ती खैरे, संतांची कामगिरी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे प्रमिला पंडित, शिवरायांचे बालपण पल्लवी खरात, शिवरायांचे शिक्षण व स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा अर्चना भालेराव,स्वराज्याचे तोरण बांधले कांचन वाघ, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त अंबादास घायाळ, प्रतापगडावरील पराक्रम सुर्यकांत बेले,शर्तीने खिंड लढवली मोहन भदाडे, शाहिस्तेखानाची फजिती अशोक माधवले , पुरंदरचा वेढा व तह पांडूरंग वाजे, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या शिवराम गिराम, गड आला पण सिंह गेला पुरुषोत्तम चौरे, एक अपूर्व सोहळा – सुनिता खरात, दक्षिणेतील मोहीम सुनिल जाधव, गडकोट आणि आरमाराचे व्यवस्थापन रमेश गाढवे,लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन अनिता जाधव इत्यादींनी मनोरंजक पद्धतीने कथाकथन केले. विद्यार्थी,पालक व परिसरातील नागरिकांनी नाट्यमय पद्धतीने साजरा केलेल्या शिवजयंती उत्सवाचा आनंद घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *