जालना, दि. १३(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत असून याचा धसका विरोधकांनी घेतला असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. जालना शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज शिवसेना-युवासेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठ माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,ए.जे.बोराडे, माजी संतोष सांबरे, युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर, जिल्हा युवा अधिकारी भाऊसाहेब घुगे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे,पंडीत भुतेकर, शहरप्रमुख विष्णु पाचपुâले, दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे, आत्मानंद भक्त, महिला आघाडीच्या संघटक सविता विंâवडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर अत्यंत प्रतिकुल परिस्थिती निर्माण होऊन ही जराही न डगमगता मित्र पक्षांना विश्वासात घेवून अत्यंत चांगले काम केले. कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी त्यावर मात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा राज्याच्या जनतेत अत्यंत चांगली आहे. आता पुढील सर्व निवडणुकांसाठी जनतेने सज्ज होवून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. जालना जिल्हा हा माझा जवळचा व अत्यंत जिवाभावाची सोबत्यांचा जिल्हा असल्याने कोणत्याही विकास कामांसाठी मी निधी कमी पडू देणार नाही, असे ही ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, राज्यातील परिस्थिती मागच्या आठ दिवसांत केलेल्या दौNयांवरुन दिसून येते की, जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व सर्व लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अत्यंत विश्वासाने पाहत आहे. याचा फायदा निश्चित प्रत्येक ठिकाणी पक्षाला होणार आहे. त्यामुळे येणाNया नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिका या सर्वच निवडणुकांत शिवसैनिकांनी
प्रचंड ताकदीने उतरुन या संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी सज्ज व्हावे. राज्यात महाविकास आघाडी झाल्यापासून विरोधक या ना त्या कारणातून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु राज्यातील जनता
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कार्याचा अनुभव घेत असून आता कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ देण्याची मानसिकता जनतेची असल्याची खोतकर म्हणाले. कार्यक्रमात बोलतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालून सर्व तालुक्यात बैठका, मेळावे घेवून वातावरण अत्यंत अनुवूâल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकNयांसाठी केलेली
कर्जमुक्ती व वेळोवेळी जनतेला संकट काळात केलेली मदत यामुळे जनताचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अत्यंत आदराने पाहत आहे. व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जाती,पाती, असा कोणतीही भेदभाव न करता विकासाचे राजकारण करत असल्याने जनतेत या सरकार विषयी जनाधार प्रचंड वाढत आहे. जालना जिल्ह्यात गाव तेथे शाखा बळकट करुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सांगितले.
तसेच यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, महिला आघाडीच्या संपर्वâ नेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, भगवान कदम, संतोष मोहिते, जयप्रकाश चव्हाण, हनुमान धांडे, कुमार रुपवते, भरत सांबरे, अंकुश पाचपुâले, अमोल ठावूâर, अजय कदम, बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, योगेश रत्नपारखे, राजु सलामपुरे, विजय पवार, घनश्याम खाकीवाले, विलास दहींहडे, किशोर नरवडे, दिपक रननवरे, किशोर पांगारकर, प्रभाकर पवार, भरत कुसूदल, संतोष सलामपुरे, हंसराज बटावाले, गणेश काळे, दत्ता बंगाळे, दिंगबर बोराडे, प्रकाश कुपटकर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी शहरप्रमुख बाला परदेशी यांनी केले. कार्यक्रमास शिवसैनिकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. असंख्य कार्यकत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश जालना शहरातील माजी नगरसेवक फिरोजलाल तांबोली यांनी त्यांच्या असंख्य कार्यकत्र्यांसह राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश
केला.
Leave a Reply