ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसैनिकांनी शेख नजीर यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा : आ. मनिषाताई कायंदे

January 25, 202213:05 PM 41 0 0

जालना (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रसार, रक्ता अभावी मृत्त पावणाऱ्या लोकांची संख्या पाहता शिवसैनिक शेख नजीर यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करत एक आदर्श निर्माण केला आहे. या शिबीरात 120 दात्यांनी रक्तदान केले असून त्यांच्या या कार्याचा आदर्श इतर शिवसैनिकांनी घ्यावा असे आ. मनिषाताई कायंदे यांनी म्हटले आहे. हिंदुऱ्हदयसम्राट, शिवसेना प्रमुख, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता. 23) रोजी बसस्थानक परिसरात शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले व शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे उपजिल्हा प्रमुख शेख नजीर यांच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराच्या उद्घाटना प्रसंगी आ. कायंदे ह्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर मा. वि. म. च्या अध्यक्षा ज्योती ताई ठाकरे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भास्कर अंबेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, युवानेते अभिमन्यू खोतकर, भगवान पाचफुले, दादाराव पाचफुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना स्व. बाळासाहेबांच्या आदर्शावर चालणारे शिवसैनिक हे आजही समाज सेवेचा वारसा पुढे घेवून जातांना दिसत आहे. त्याबद्दल आशा शिवसैनिका संदर्भात आम्हाला गर्व आहे. यावेळी मा. वि. म. च्या अध्यक्षा ज्योती ताई ठाकरे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भास्कर अंबेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचे समयोचित भाषण झाले.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख संतोष माहिते, अलमभाई, जावेदभाई, जफारभाई, नगरसेवक निखिल पगारे, संदीप नाईकवाडे, रविकांत जगधने, सगीर भाई, अलिम भाई, विजय पवार, अस्लम बेग, जावेदभाई, जम्मू भाई, शेख नदीम, शेख अस्लम, शेख फईम, शेख शफीक, शेख शारूख, शेख अंसार, विष्णू हिवाळे, किशोर शिंदे, किशोर नरवडे, घनश्‍याम खाकिवाले, राजेश घोडे, राम खंडेभराड, शुभम टेकाळे, अनिकेत काळे, नागेश डोले, नगरसेवक गोपी बोबडे, राजेश घोडे, सविता कवडे, सिमा पवार, गंगुबाई वानखेडे, देशमुखताई, सिमा पवार, मंजुषा घायाळ आदींची उपस्थिती होती.
संकट काळात शिवसैनिक तत्पर असला
पाहिजे : माजी मंत्री अर्जुनराव खोतकर
गोर-गरीब जनतेवर संकट आले की, संकट काळात शिवसैनिकांनी धाव घेत त्या संकटाचा सामना करण्यासाठी तत्पर राहीले पाहिजे. असे गौरवोद्गार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रक्तदान शिबीरा प्रसंगी बोलतांना व्यक्त केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा संपूर्ण देशभरात होता. दिल्ली सुध्दा त्यांना हादरत होती. असे नमूद करत अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला.
रक्तदान ही काळाजी गरज ः शहर प्रमुख विष्णू पाचफुले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा मोठा तुटवडा जाणवल्यामुळे अनेक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्याही देश तीसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याने व भविष्यात रक्ताची कमतरता भासु नये म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेना व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने या रक्तदान शिबीराचे आयोजन केले आणि त्यास शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रक्तदान ही काळाजी गरज असून शिवसैनिकांनी असे रक्तदान वेळोवेळी करावे असे आवाहन देखील शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *