ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसंपर्क मोहिमेस धडक्यात सुरुवात शिवसंपर्क अभियान तसेच शिवसंपर्क शिव रथाचे शुभारंभ ग्रामीण भागाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार- माजीमंत्री खोतकर

July 13, 202113:17 PM 57 0 0

जालना, दि. १२(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन राज्यात आजपासून शिवसंपर्वâ मोहिम सुरु करण्यात आली. त्यानुसार जालना जिल्ह्यातही बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिवसंपर्वâ मोहिमेस सुरुवात करण्यात आली. गावो-गावी झालेल्या बैठकांत तेथील ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी अनेक अधिकाNयांना तेथूनच फोनव्दारे सुचना केल्या. या मोहिमेस सर्वच ठिकाणी उत्स्पुâर्तपणे प्रतिसाद मिळाला तर अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गावात पदाधिकाNयांचे स्वागत केले. सेलगाव, काजळा, गेवराई बाजार, वाकुळणी, रोषनगाव, निकळक या पंचायत समिती गणांच्या बैठका घेण्यात आल्या.

यावेळी किसान सेनेचे भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य वैâलास चव्हाण, गणेश डोळस, पंचायत समिती सभापती भगवान शिंदे, रविकुमार बोचरे यांच्यासह उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच यांची उपस्थिती होती. यावेळी बैठकांतून बोलतांना माजीमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात सर्वत्र शिवसंपर्वâ अभियान राबवून गावपातळीवर संघटना मजबुत करण्यासह तेथील प्रश्न समजून घेवून ते तडीस नेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आम्ही सर्व पदाधिकारी गावपातळीपर्यंत जावून समस्या जाणून घेत आहोत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात अत्यंत प्रभावशाली कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल देशासह जगानेही घेतली आहे. विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मात्र चांगले काम करणे सोडले नाही. आपणही गाव पातळीवर समन्वय ठेवून लसीकरण करुन कोरोनामुक्त गाव ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही मांडलेल्या सर्व समस्या मी शासन दरबारी मांडून त्या निकाली काढण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचे खोतकर म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी बैठकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेवून ते अंमलात आणून त्यांना दिलासा देण्याचे काम केले. शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून राज्यातील लाखो शेतकNयांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत दिलेल्या वचनाची पुर्तता केली. तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही शेतकNयांच्या योजना बंद न करता त्याचा लाभ लोकांना कसा मिळेल यासाठी कसोसीने प्रयत्न केले. कोरोना अटोक्यात यावा या करिता त्यांनी केलेल्या उपाययोजना देशासाठी मार्गदर्शक ठरल्या. पक्ष संघटना मजबुत करण्यासाठीही त्यांनी अगदी तळापर्यंतच्या पदाधिकाNयांच्या बैठका घेतल्या. शिवसंपर्वâ मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शाखा, प्रत्येक घरात शिवसैनिक निर्माण व्हावा तसेच संघटनेचा लोकांना उपयोग व्हावा, त्या माध्यमातून लोकांच्या समस्या सुटाव्यात, हा हेतू ठेवून गावा-गाव जाण्याचे आदेश दिले. असा अत्यंत प्रामाणिक हेतू ठेवून काम करणारा मुख्यमंत्री विरळाच. कोरोना काळात झालेल्या टिकेला सयम दाखवत मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामातून उत्तर दिले. याच मोहिमेतून शिवसेनेची मोठ्या प्रमाणता सदस्य नोंदणी करण्याचे आवाहनही अंबेकर यांनी केले. माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, जिल्हाभर ही मोहिम राबविण्यात येत असून याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात अत्यंतबिकट परिस्थिती असतांनाही लोकांना न्याय देण्याचे काम ते करत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुत करण्यावर भर देणार असून आगामी निवडणुका या ताकदीवर जिंकण्याचा प्रयत्न पक्ष करणार असल्याचे माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले. बॉक्समध्ये घेणे. मुख्यमंत्र्यांचे कार्य अत्यंत प्रामाणिक- उपनेते वडले उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शेतकNयांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयातून ते स्पष्टपणे दिसते. तसेच दुष्काळ असो अतिवृष्टी अथवा कोरोना या सर्व संकटप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ठामपणे लोकांच्या मागे उभे राहीले. कसल्याही प्रकारचा अनुभव नसताना अत्यंत उत्कृष्टपणे ते काम करीत आहेत. त्यामुळे विरोधक अस्वस्थ होवून त्यांच्यावर टिकाटिपणी करीत असल्याचे वडले म्हणाले. यावेळी नंदकिशोर दाभाडे, दिपक रननवरे,श्रीराम कान्हेरे, किसन खांडेकर, अंकुश शिंदे,पद्माकर पडूळ, शिवाजीराव मदन, सिताराम गोरे, सुभाष काटकर,अच्युतराव अंभोरे, परमेश्वर मात्रे, संभाजी अवघड, संतोष नागवे,राजेश जNहाड, बाला गारखेडे, बळीराम मोरे, शकुर बेग, विष्णु गारखेडे, भगवान सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, सुदाम काळे, प्रसाद चव्हाण, संभाजी सोनवणे, दत्ता जगताप, बळीराम कोल्हे, हरिभाऊ कापसे, आप्पासाहेब झरेकर, कृष्णा कोल्हे, महादू गीते, राजू थोरात, वैजनाथ शिरसाट, अंकुश वाघ, रमेश ब्राह्मणजाई, विकास घाडगे, कलीम कुरेशी, प्रताप काळे, संदीप खरात, भागचंद महेर, महमूद शेख, मोहम्मद सादिक, रामप्पा मोरे, उद्धव आंबोरे, सुरेश घोरपडे, संजय अंभोरे, गणेश अंभोरे,रावसाहेब पैठणे, आबासाहेब पैठणे, सुभाष आरसूळ, कल्याण डाके, दत्तू नन्नवरे, गजानन बोंद्रे, सिताराम कापसे, रावसाहेब गारखेडे, लक्ष्मण पवार, बबन अंभोरे, शिवाजी अंभोरे ,भगवान जाधव, अंकुश वाघ, उद्धव राऊत, बाळू कातुरे, गणेश लोंढे ,गजानन मोरे, नारायण जिवडे, बंडू जिवडे, रावसाहेब भिडे, भरत गारखेडे, अर्जुन मात्रे, देवकरण शेळके, अनिल वाघ, रंगनाथ कदम, अण्णा बनसोडे, विक्रम तुपे, किशोर मदन, पी.डी. मदन, संजय मदन, रमेश मदन, रवी मदन, सुभाष मदन, कल्याण मदन, रावसाहेब सुरोशे, रामेश्वर मदन, विठ्ठलराव मदन, सोमीनाथ मदन, संभाजी मदन, गजानन लहाने, लक्ष्मण कान्हेरे, अंबादास कानेरे, अर्जुन चव्हाण, बन्सी होर्षीळ, बाबू मोरे, विलास मोरे, रमेश मोरे, गजानन गाडेकर, गजानन कदम, कृष्णा कडूस, कप्पूसिंग जगरवाल, जनाबापू कोलते, बंडू नागवे, रामेश्वर नागवे, माणिकराव गायके, रामु जगरवाल, प्रल्हाद भडांगे, बबनराव शिंदे, रामनाथ शिंदे, रामदास शिंदे, रामेश्वर शिंदे, जगन्नाथ शिंदे, कैलास जोशी, विष्णु शिंदे, बाबासाहेब शिंदे, नामदेव शिंदे, योगेश शिंदे, भगवान शिंदे, शेख यावर, शेख मुन्शी, अमोल घुगे, शरद घुगे, ज्ञानेश्वर घुगे, भगवान राम, निलेश शिंदे, अंकुश शिंदे,दामोदर जाधव, सुदाम जाधव आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *