ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेना दलित आघाडी जिल्हा आढावा बैठक

December 1, 202116:08 PM 43 0 0

जालना : शिवसेना दलित आघाडी जिल्हा आढावा बैठक आज २९ नोव्हेंबर रोजी जालना येथील ४८८ येथील विश्रामगृहात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शिवसेना दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे म्हणाले की, शिवसेना दलित आघाडीच्या वतीने १८ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी जालना येथे आक्रोश मोर्चा काढून १२ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्पâत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. बारा मागणी निवेदन सोबत आहे. त्या त्यासंदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी खाते निहाय पाठविण्यात येवून आम्हाला कळविण्यात आले.

मात्र खाते निहाय अंमलबजावणी तर नाहीच आम्हाला काहीच कळविले नाही. म्हणून जिल्हाधिकारी जालना, निवासी उपजिल्हाधिकारी जालना सोबत १७ नोव्हेंबर रोजी सविस्तर चर्चा करुन पुन्हा जिल्हाधिकारी जालना यांनी स्मरणपत्र खातेनिहाय कार्यालयाला पाठवून कार्यवाही करुन संबंधीसोबत चर्चा करुन उलटपाळी कळवा. त्यानुसार अजुन तरी कोणालाही खाते निहाय कार्यालयाने दाखल न घेतल्यामुळे आज २९ नोव्हेंबर रोजी सोमवारी शिवसेना दलित आघाडी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उद्या ३० नोव्हेंबरपासून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार भोकरदन, अंबड, परतुर आणि जालना उपविभागीय आणि तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन पुढील आंदोलनाची दिशा जी की, १८ ऑक्टोंबरच्या निवेदनानुसार आहे. ती म्हणजे डिसेंबरमध्ये पालकमंत्री जालना यांच्या निवासाला घेराव घालून जिल्हाधिकारी जालना येथे हजारो दलित आदिवासी जेलभरो आंदोलन करणार आहे. असे ही या आढावा बैठकीत ठरविण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यातील दलित आदीवासी भुमिहिन गायरान कास्तपट्टे नावे करुन सातबारा देणे बाबत. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील दलित आदिवासी भुमिहिन कास्तकारांना मिळालेल्या शासकीय जमीनी गायरान जमीनी सिलिंग अ‍ॅक्टमधील शेतजमीनी, ईनामी जमीनी आदी संगणकीय सातारा वरुन लाभाथ्र्यांचे नावासमोर क्षेत्र पोटखराबी मध्ये दाखवत असल्याने लाभाथ्र्यांना शासकीय मदतीशिवाय बँकेच्या कर्जापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामध्ये दुरुस्ती करुन क्षेत्र पुर्ववत करण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन मौजे पाथरवाला बु ता. अंबड जि. जालना येथील शासकीय जमीन गट नं. १५४ मधील ५१ हेक्टर ३३ आर शेतजमीन स्थानिक दलितांना २-२ एकर जमीन पट्टे शेतीसाठी वाटप करुन दलितांची आर्थिक उन्नती साधावी आणि ऊस संशोधन वेंâद्र एजन्सी समर्थसह साखर कारखाना मालकीच्या ४०३ एकर जमिनीपैकी ३०३ एकर पडीत जमीनींमध्ये स्थापन करण्यात यावा. शासनाचे घरकुल इंदिरा आवास, रमाई आवास, शबरी घरकुल, पारधी आवास, प्रधानमंत्री आवास योजनेतून उपेक्षित समाजातील वंचितांना निवारा देण्यात यावा. आदी मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीस तालुकाप्रमुख भाऊसाहेब तांबे, अण्णासाहेब बाळराज, अंबड-घनसावंगी समन्वय जय खरात, विष्णु शिंदे, मधुकरराव पाईकराव, प्रल्हाद साळवे, मधुकर मोरे, तुळशीदास पटेकर, राजु ढगे, मंगलताई गुढेकर, शैलेश भालेराव, अंबड शहरप्रमुख विलासराव खरात, राजु नरवडे, राजेंद्र यटाळे, दगडू नाटकर, भाऊसाहेब पांजगे, भगवान तांबे, मच्छिंद्र भायतडक, दशरथ तांबे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *