जालना, दि. १६(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात सर्वत प्रथम कोरोनाची लस दिलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाNयांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी पुष्पगुच्छ देवून व कर्मचाNयांवर पुष्पवृष्टी करुन शुभेच्छा दिल्या. यात डॉ. पद्मजा अजय सराफ, डॉ. संजय जगताप यांच्यासह अहोरात्र रुग्णसेवा करणाNया नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक यांना कोव्हीड१९ ची लस टोचण्याचा मान सर्वप्रथम देण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव म्हणाले की, आजचे लसीकरण हा ऐतिहासिक क्षण आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगात आलेल्या या महामारीत सर्व मानव जातीवर आलेल्या या भयंकर संकटात वेळोवेळी सर्वांना दिलासा दिला व भितीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. धार्मिक ग्रंथात लक्ष्मणाला जेंव्हा युध्दात शक्ती लागते तेंव्हा हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून प्राण वाचविले. त्याच प्रमाणे ही लस म्हणजे नागरिकांसाठी संजीवनी असल्याचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सांगितले. तसेच अदर पुनावाला व त्यांच्या शास्त्राज्ञांनी कोरोनावर लस तयार करुन देशातीलच नव्हे तर अवघ्या जगातील समस्त मानव जातीला संजीवनी देण्याचे काम केले. कोविडची लस निर्माण होण्याआधी असलेल्या भितीदायक वातावरणात सतत आधार देवून त्यातच जगण्याची उमेद घेवून येणारा आज हा क्षण साक्षात येवून ठेपला आणि लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीसंदर्भात नागरिकांमध्ये वेगवेगळे समज-गैरसमज पसरत आहे. तरी या बाबत कोणतेही गैरसमज मनात न बाळगता सर्वसामान्यांसाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर प्रत्येकाने नोंदणी करुन ही लस घ्यावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. यावेळी शहरप्रमुख विष्णु पाचपुâले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दर्शन चौधरी, राम भुतेकर, सुभाष पितांबरे यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांंची उपस्थिती होती.
Leave a Reply