ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कामगारांना दिले मोठे पॅकेज

July 13, 202216:28 PM 22 0 0

उरण (तृप्ती भोईर) : उरण तालुका म्हणजे औद्योगिकीकरण हे समीकरण त्यातीलच एक जी. डी. एल कंपनी होय. याच जी.डी.एल. मधील पर्ल फ्रेट कंपनीतील २२४ स्थानिक कामगारांना भरघोस पगारवाढ व इतर लाभ मिळवून देण्यासाठीचे काम शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी केले आहे.
‌जी.डी.एल. मध्ये कार्यरत पर्ल फ्रेट कंपनीतील २२४ स्थानिक कामगारांना (लोकल लेबर) यांचा वेतनवाढीचा करारनामा मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ रोजी करण्यातआला. सदर करारनाम्यां वर सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती शीतल कुलकर्णी यांच्या समक्ष सह्या करून दोन्ही पक्षांनी आपली मान्यता दर्शिवली.
करारनाम्याची ठळक वैशिष्ट्ये :-
१. ‌ पुढील तीन वर्षांकरिता रुपये ५९००/- पगारवाढ.
२. कामगार व त्यांच्यावर अवलंबित परिवारातील सदस्यांना रुपये ३,००,०००/- वैद्यकीय विमा.
३. सेवानिवृत्त कामगार / मयत कामगार यांच्या जागेवर त्यांचा वारसांना नोकरी मिळणार.

४. सेवानिवृत्त कामगार / मयत कामगार यांच्या वारसांना रुपये ८,००,०००/- कायदेशीर देण्या व्यतिरिक्त देण्यात येणार आहेत.
सदर करारनामा श्रीमती शीतल कुलकर्णी सहाय्यक कामगार आयुक्त, पनवेल यांच्या समक्ष सह्या करून मान्य करण्यात आला .
यावेळी शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष, मा.आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख श्री मनोहरशेठ भोईर, संचिव महेंद्र सावंत,युनिट अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सल्लागार के. डी. भोईर, हितेश भोईर, लाइलेश भोईर, कामगार प्रतिनिधी तसेच पर्ल फ्रेट चे श्री शरद पाटील व श्री विशाल पाटील उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *