जालना ( प्रतिनिधी) : तालुक्यातील निरखेडा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली असून पॅनल प्रमुख, सरपंच,उपसरपंच व विजयी सदस्यांचा गुरूवारी ( ता. ११) शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. निरखेडा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शिवसेनेच्या स्वाती सिध्देश्वर पुरी तर उपसरपंच पदी लता कृष्णा जाधव यांची निवड झाली. पॅनल प्रमुख व विजयी सदस्यांनी आज दर्शना निवासस्थानी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची भेट घेतली.
या वेळी पंडितराव भुतेकर, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, विभाग प्रमुख काशीनाथ राजे जाधव यांची उपस्थिती होती.
गत महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विभाग प्रमुख काशीनाथ राजे जाधव, पॅनल प्रमुख बापुराव जाधव, कृष्णा सुरासे यांनी सर्व घटकांना समवेत घेऊन विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवली. सर्व सात जागांवर विजय मिळवून विरोधी गटास आस्मान दाखवले. काल झालेल्या विशेष सभेत सरपंच पदी स्वाती सिध्देश्वर पुरी यांची तर उपसरपंच पदी लता कृष्णा जाधव यांची निवड करण्यात आली. सदस्य अशोक पाडमुख, महादेव जाधव, विलास जाधव, प्रदीप पाडमुख, सिताराम पवार यांच्या सह सिध्देश्वर पुरी, राजू जाधव यांचा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केला. या वेळी अनिल पुरी, शंकर जाधव, वैजीनाथ जाधव, संभाजी जाधव, गणेश जाधव, सोपान जाधव, भगवान जाधव, अशोक कळकुंबे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply