ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ढाकेफळ ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा; गावाचा विकासासाठी समन्वयाने काम करा : अर्जुनराव खोतकर

February 1, 202113:01 PM 50 0 0

जालना ( प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ढाकेफळ ता. घनसावंगी येथील ग्रामपंचायती वर शिवसेनेने तब्बल वीस वर्षानंतर एक तर्फी विजय संपादन करत पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालकांच्या गटास अस्मान दाखवले.पॅनलप्रमुखव नवनिर्वाचित सदस्यांचा रविवारी ( ता. २१) शिवसेना नेते ,माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केला.

ढाकेफळ येथील विजयाचे शिल्पकार व सदस्यांनी आज माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ” मतदारांनी प्रस्थापितांना नाकारून गाव विकासाची सुञे तुमच्या हाती सोपवली आहेत. सुञबध्द योजना आखून परस्पर समन्वयाने गावचा सर्वांगीण विकास करा ” असा सल्ला माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी या वेळी बोलतांना दिला.
पॅनल प्रमुख बालाजी गाढवे,दत्ता गाढवे, रमेश चांदर, यांच्या सह नवनिर्वाचित सदस्य कैलास गाढवे, रूस्तूम चांदर, मंगल गाढवे, शारदा चांदर, रामेश्वर गाढवे, अनिता पवार, संदीप येडे, सतूबाई पवार, लक्ष्मी थोरात, यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बद्रीनाथ गाढवे, दत्ता गाढवे, रेवा नाईक, शेषराव येडे,ओमप्रकाश येडे,प्रेम राठोड, प्रल्हाद चांदर,रुषी कुलकर्णी, उतम पटेकर , संतोष येडे,राधाकिशन चांदर,दिनकर चांदर,महादेव चांदर, आण्णासाहेब चांदर, सुदाम पवार, नारायण थोरात, कैलास पवार यांच्या सह पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *