ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

17  जुन रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप

June 16, 202212:23 PM 22 0 0

उरण (संगीता ढेरे ) : वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकशाही, कायदेशीर मार्गाने लढणारी एकमेव व आक्रमक संघटना म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ओळखली जाते.शिवा संघटनेने देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती शासनाला सुरू करायला लावली तेव्हा पासुन जयंतीला मोठे सार्वजनिक स्वरूप येण्यासाठी एक महिना महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम उपक्रम घेऊन जयंती द्विपंधरवाडा सुरू केला. या वर्षीचा शिवा संघटनेच्या जयंती द्विपंधरवाड्याचे उद्घाटन दि.3 मे रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे झाले. तर जयंती द्विपंधरवाडा अंतर्गत महिनाभर महाराष्ट्र व इतर राज्यासह विविध कार्यक्रम, उपक्रम घेऊन जयंती साजरी होत आहे.या द्विपंधरवाड्याचा समारोप मुंबई येथे मंत्रालयाच्या समोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.17 जुन रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.

जयंती द्विपंधरवाडा समारोप समारंभ व शासनाच्या वतीने मागील सहा वर्षाचा (2016-17 ते 2022-23) प्रतिवर्षी वीरशैव-लिंगायत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक व्यक्ती व एक संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार शासनाकडून दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,ओबीसीचे मंत्री विजय वडेट्टीवार, ओ.बी.सी चे राज्य मंत्री बच्चुभाऊ कडु, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरजी धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. दलितमित्र पुरस्काराप्रमाणे वीरशैव-लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिवर्षी एक व्यक्ती व एक संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारांने शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी अनेक मंत्री, आमदार, गणमान्य व्यक्त, शिवा संघटनेचे राष्ट्रीय,राज्य, जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुंबई, पालघर, ठाणे,नवी मुंबई,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व वीरशैव-लिंगायत समाज बांधवांनी तसेच महात्मा बसवेश्वर प्रेमींनी दि.17 जुन 2022 रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा व शासकीय महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार वितरण समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी नियोजन करावे व उपस्थित रहावे असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना मुंबई, पालघर,ठाणे, नवी मुंबई रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *