जालना (प्रतिनिधी) – बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालयाचे क्रिडा शिक्षक सुधाकर केशवराव बोर्डे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.
श्री. सुधाकर बोर्डे हे शिवाजी विद्यालयात 5 नोव्हेंबर 1990 रोजी सेवेत दाखल झाले होते. 31 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या सेवेला तीस वर्षे एक महिला 17 दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कार्यकाळातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी करत तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यपातळीपर्यंत आपल्या क्रिडा शिक्षणाची चुणूक दाखवली आहे. श्री. बोर्डे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्याची उपस्थिती होती.
Leave a Reply