ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

किल्ले मर्दनगडावर झाला शिवघोषाचा गजर; शेकडो शिवभक्तांच्यां उपस्थितीत गड पूजन सोहळा झाला संपन्न

February 23, 202215:24 PM 35 0 0

उरण  (संगीता ढेरे) : शिवरायांचे आठवावे रूप! शिवरायांचा आठवावा प्रताप !! शिवरायांचा आठवावा साक्षेप भुमंडळी !!!…अश्या विश्ववंदनीय शिवरायांच्या शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत उरण – आवरे गावाच्या दक्षिणेला असलेला शिवकालीन किल्ला ( टेहळणी बुरुज ) म्हणजेच मर्दनगड किल्ला. ह्या मर्दनगडावर आवरे गावचे उपक्रमशील व आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मर्दनगड संवर्धन समिती आवरे यांच्या तर्फे मर्दनगड किल्ल्यावर गडाचे गडपूजन, ध्वजपूजन आणि सोबतच तिथे येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना त्या गडाची आणि परिसराची माहिती मिळावी म्हणून किल्ल्याच्या माहिती फलकाचे अनावरण शेकडो शिवभक्तांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ह्या कार्यक्रमा प्रसंगी गडावर उपस्थित शिवभक्तांना महाराज्यांच्या अद्भुत,अतुलनीय पराक्रमाची आणि ज्वलंत इतिहासाची गाथा आपल्या पहाडी आवाजात पोवाड्याच्या गायनाने गातं शिवशाहीर वैभवजी घरत यांनी करून देत गडावरचं वातावरण मंत्रमुग्ध केलं आणि सारा परिसर जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत साकारलेल्या ह्या शिवमय कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली ती उरणचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, सरपंच निराताई पाटील,संपर्क प्रमुख महादेव घरत,मनसेचे संदेश ठाकूर,रायगड भूषण राजू मुंबईकर, गणेश म्हात्रे, पत्रकार घनश्याम कडू, रमेश म्हात्रे,अशोक ठाकूर ,महेश गावंड,गुरुनाथ गावंड,संतोष पाटील,अमित म्हात्रे,शाम गावंड,पद्माकर गावंड,विद्याधर गावंड सर, शिवराज प्रतिष्ठानचे गणेश तांडेल,दुर्गमावळाचे चेतन गावंड,प्रांजळ पाटील,अमित पाटील, रवि भोईर,नवपरिवर्तनचे किशोर म्हात्रे,गणेश भोईर,मित्र परिवाराचे संपेश पाटील,रोशन पाटील,यांच्या सह आजूबाजूच्या परिसरातील शेकडोंच्या संख्येने शिवभक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक कौशिक ठाकूर , शंकर पाटील,अविनाश ठाकूर, दीपेश ठाकूर, प्रशांत म्हात्रे,दिलेश ठाकूर,विनोद ठाकूर,तुषार म्हात्रे,संतोष म्हात्रे,प्रमोद ठाकूर,सुजित ठाकूर,के.टी.गावंड,रोशन गावंड,मंगेश गावंड,निखिल गावंड,गुरू गावंड,अमेय ठाकूर,संदीप ठाकूर,हितेंद्र म्हात्रे,करण ठाकूर, चरण गावंड,राहुल गावंड,चंदन गावंड यांनी खूप मेहनत घेतली. तर ह्या कार्यक्रमाच सूत्रसंचालन सुनिल वर्तक यांनी केले.अश्या प्रकारे हा भव्यदिव्य शिवमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उदंड प्रतिसादात व हर्षोउल्हासात संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *