उरण (संगिता पवार ) सह्याद्री हा महाराष्ट्रभूमीचा अनमोल दागिना आहे. याच अनमोल,अफाट, बेलाग आणि राकट सह्याद्रीच,सह्याद्रीतील गिरिशिखरांच आणि गिरिशिखरांवर असलेल्या पावन-पवित्र गडकोंटाच, इथल्या जाज्वल्य इतिहासाशी अतूट असं नात आहे. स्वराज्याचे वैभव असलेल्या छत्रपती शिवरायांच्या ह्या गडकिल्ल्यांचे पावित्र आपण जपणे आपले कर्तव्य आहे. हा सकारात्मक विचार आपल्यामध्ये आत्मसात करून “शिवक्रांती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य”संस्थेच्या पनवेल, कर्जत, मुरबाड, शहापूर विभागाच्या वतीने स्वराज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वराज्याची राजधानी असल्येल्या रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती भारावून जातो. परंतु सुशिक्षित आणि बुद्धिजीवी असणाऱ्या माणसांच्या हातून कळत नकळत पणे अस्वच्छता पसरली जाते. चॉकलेट्स, वेफर्स चे रॅपर, प्लॅस्टिक च्या बॉटलस, कॅरीबॅग इ. असे सर्व केरकचरा त्या ठिकाणी पर्यटक टाकतात. त्यामुळे पर्यवरणाची हानी सुद्धा होते आणि पवित्र असणाऱ्या भूमीला अपवित्र करण्याचं काम लाखो येणाऱ्या सुशिक्षित माणसांच्या हातून घडले जाते. हे सर्वकाही थांबले पाहिजे हे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने शिवरायांचा आदर्श ठेवून ‘शिवक्रांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किल्ले रायगडावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते मा.विवेक भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुरबाड तालुक्याचे घरत सर यांनी उपस्थितांना रायगडचा इतिहास सांगून मंत्रमुग्ध केले.सोबतच शिवक्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष. प्रसाद भोपी,सहसचिव.मयूर पावशे, सहखाजिनदार. अनिकेत काठे व पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत, मुरबाड-शहापूर पनवेल विभागाचे अनेक सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. असेच अनेक मोहीमा आणि सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक उपक्रम सामाजात राबवत राहू अशी ग्वाही यावेळेस प्रत्येक सदस्याने दिली. संस्थेच्या कर्जत तालुका अध्यक्ष अविनाश भोईर आणि मुरबाड-शहापूर तालुका अध्यक्ष जागृती धलपे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्या- श्रमामुळे ही मोहीम यशस्वी रित्या पार पाडण्यात आली.
Leave a Reply