उरण प्रतींनिधी (संगीता ढेरे) : एक विशेष अभ्यास भटकंती मोहीमे चे आयोजन करण्यात आले होते श्री रायगड स्थळ दर्शन दिनांक :- १०- ११ जुलै २०२१ रोजी उरण हेथुन रात्री १०:०० च्या सुमारास गाडी चे पूजन करून प्रस्थान दुर्ग दुर्गेश्वर श्री रायगड च्या दिशेने झाले. अभ्यास मोहिमेस जाणाऱ्या मावळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी *श्री संदेश भाई ठाकूर* संस्थापक अध्यक्ष शिवराज युवा प्रतिष्ठान, सौ.संगीता ढेरे मॅडम उपाध्यक्ष शिवराज युवा प्रतिष्ठान श्री.उमेश वैवडे खजिनदार शिवराज युवा प्रतिष्ठान, सौ.पूजा प्रासादे मॅडम सहखजिनदार शिवराज युवा प्रतिष्ठान; श्री.योगेश म्हात्रे सहचिटनिस शिवराज युवा प्रतिष्ठान, श्री.धनंजय भोरे अध्यक्ष शिवराज युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ शिवराज युवा प्रतिष्ठान संस्थेचे असंख्य कार्यकर्ते उपस्तीत होते ११ तारीख रविवारी पूर्ण दिवस रायगड भटकंत करण्यात आली
मोहीम चे मार्गदर्शक दुर्ग अभ्यासक
श्री जयकांत दादा शिंक्रे* ह्यांचा मोलास सहकार्य आम्हाला लाभला
गडकोट म्हणजे महाराजांचा जीव की प्राण,याच महाराष्ट्रातील जंगलाच्या ,दऱ्या खोऱ्यांचा , सह्यद्रीचा अभ्यास करून , राजीयांच्या मनात आले , हा रायरीचा डोंगर नजरेत हेरून ,शब्द बाहेर आले ( तख्तास जागा हाच गड करावा )त्यातून हिरोजी इंदळकर यांच्या अफाट दुर्ग बांधनीतून स्वराज्याच्या राजधानीची निर्मिती झाली एका अभेद्य दुर्गाची , सह्यद्रीचा राजा रायगड ,याच रायगडाने कितीतरी गोष्टी स्वतःच्या नजरेने पाहिल्या ,(आई बाळाचं एक अतूट नाते हिरकणी, महाराजांचा राजा राजाभिषेक सोहळा , कितीतरी लढाईचे गुप्त बेत, कितीतरी शूर सरदार ,मावळे , पराक्रमी विरस्त्रिया ,स्वराज्याचे संस्कार, महाराजांची स्मारक छत्री समाधी) अश्या बऱ्याच गोष्टी प्रत्क्षय माहिती घेऊन अनूभवता आल्या ( जन्माला आलोय तर एक वेळ तरी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा ,एक वेळ तरी ही दुर्ग पंढरी पहावी ) तरच जगण्याचे सार्थक होईल हे नक्की मोहिमेबद्दल माहिती पुढीलप्रमाणे
(नाणे दरवाजा मार्गे मोहिमेला सुरुवात)
स्थळ दर्शन सुरू
– महादरवाजा व त्यावरील बाहुबली पाण्याचे टाके
– गडपूर्वीचे बुरुज
– प्राचीन ब्रिटिशकालीन तोफा
– हनुमंत टाके
– हत्ती तळे
– शिरकाई देवी मंदिर ( पूजन )
( सर्वाना चहा नाष्टा )
– होळीचा मांड ( पूजन )
– तोफा
– सातवाहन काळ पाण्याचे टाके
– नगारखाना
– राजसदर
– सिहासंन दर्शन
– महाराजांचा राजवाडा
– दिवाण A आम A खास
– खलबत खाना
– टाकसाळ
– राणी वसा
– मेणा दरवाजा
– रोपवे मार्ग
– अष्टप्रधान वाडे
– धान्य कोठारे
– पालखी दरवाजा
– मनोरे
– गंगासागर तलाव
– शिवकालीन बाजारपेठ ( हुजूर बाजार)
– जगदीश्वर मंदिर
– महाराजांची समाधी( स्मारक छत्री)
– शिलालेख
– सवेची पायरी ( हिरोजी इंदळकर )
( दुपारचे जेवण )
– धान्य कोठारे
– दारू गोळा कोठारे
– टकमक टोक
– शिक्षालोह खांब – हत्यीखाना
-( शक्य असेल तर हिरकणी बुरूज किंवा वाघ दरवाजा किंवा भवानी कडा )
गडफेरी पूर्ण
*(चित दरवाजा मार्गे गड उतर करून मोहिमेची सांगता करण्यात आली)*
मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व ६० मावळ्यांचे , गडप्रेमीनंचे आभार आयोजक श्री . जयकांत दादा शिंक्रे, मोहीम मार्गदर्शक, दुर्ग अभ्यासक, श्री .गणेश तांडेल, शिवराज युवा प्रतिष्ठान गड संवर्धन संस्था अध्यक्ष श्री. गणेश माळी, शिवराज युवा प्रतिष्ठान द्रोणागिरी गड संवर्धन अध्यक्ष श्री.गणेश भोईर, श्री.यज्ञेश म्हात्रे, श्री.कौशिक म्हात्रे, श्री.हर्षल म्हात्रे, श्री.राजेश्वर नाईक, श्री.वैभव भोईर, श्री.महेश जाधव, श्री.रावी म्हात्रे.
Leave a Reply